• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चेकवर LAC लिहायचं की LAKH? काय बरोबर? 99 टक्के लोक चुकतात, आरबीआय काय सांगते

July 26, 2026 by admin Leave a Comment


आपण सर्वच जण आपल्या दैनंदिन आयुष्यात पैशांचे व्यवहार करत असतो. आपल्यापैकी जवळपास सर्वांचच बँकेत खातं देखील असतं. बँक खात्यातून पैसे काढणं, पैसे जमा करणं, बँकेकडून कर्ज घेणं, कर्जाची परतफेड अशी काम सुरूच असतात.  आपण जेव्हा पैशांचे छोटे-छोटे व्यवहार बँकेच्या माध्यमातून करतो, तेव्हा आपण तो थेट करतो. परंतु जेव्हा पैशांचे मोठे व्यवहार असतात, जसं की आपण एखाद्याला लाखांमध्ये पैसे देणार असतो, किंवा कोणाकडून पैसे घेणार असतो. तेव्हा साधारणपणे चेकचा वापर होतो. तसेच कोणाला जर पैशांची गॅरंटी द्यायची असेल तरी देखील आपण त्या व्यक्तीकडे बँकेत डिपॉझिट करण्यासाठी चेकच देतो.

परंतु अनेकजण चेक लिहिताना मोठी चूक करतात, चुकीच्या पद्धतीने लिहिलेले चेक रिजेक्ट होण्याचा देखील धोका असतो. जर तुमचा चेक रिजेक्ट झाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते, तसेच काही परिस्थितीमध्ये तुम्हाला जेलमध्ये देखील जावे लागू शकते. त्यामुळे चक लिहिताना नेहमी काळजी घेतली गेली पाहिजे. चेक लिहिताना होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे अनेकजण LAC आणि LAKH मध्ये मोठा गोंधळ घालतात. अनेकांना हे माहितच नसतं की चेकवर LAC लिहायचं आहे की,  LAKH? याबाबत आता आरबीआयकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

आरबीआयचा नियम काय सांगतो? 

आपण जेव्हा इग्रजीमध्ये चेकवर रक्कम टाकतो त्याच्यापुढे LAC किंवा LAKH लिहितो, परंतु यात काय बरोबर असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार चेकवर रक्कम टाकताना LAKH असंच लिहावं आणि हाच योग्य शब्द आहे.  आरबीयाच्या नियमानुसार तुम्हाला जर दोन्ही शब्दांमध्ये कन्य्फूजन असेल तर तुम्ही एकाचवेळी LAC आणि LAKH  अशा दोन्ही स्पेलिंग लिहू शकत नाही. तुम्हाला बँकेतून पैसे काढायचे असेल तर LAKH असाच शब्द लिहावा लागेल उदाहारण द्यायचं झालं तर 1  LAKH असं तुम्हाला चेकवर लिहावं लागेल असं आरबीआयने म्हटलं आहे. LAC हा शब्द कोणत्याही बँक व्यवहारात वापरला जात नाही, LAKH हाच अधिकृत शब्द आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
  • लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड
  • MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
  • ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका, तब्बल 35 हजार लोकांनी केले अनफॉलो..
  • Nepal Flood: पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली घरं, हजारो लोक गेले वाहून, अंगावर काटा येईल असं पुराचं रौद्र रुप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in