• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चीन मोठ्या संकटात; देशात मोठी खळबळ, भारतासाठी आनंदाची बातमी

July 15, 2026 by admin Leave a Comment


जगातील नंबर दोनची अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त ब्रेक लागला आहे. 2026 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये एप्रिल ते जून या काळात चीनचा जीडीपी ग्रोथ कमी होऊन 4.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. 2022 नंतर चीनसोबत असं पहिल्यांदाच घडलं आहे. या आधीच्या तिमाहीमध्ये चीनच्या जीडीपी ग्रोथमध्ये 5 टक्क्यांनी वाढ सुरू होती. मार्केटमधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार सध्या चीनच्या अर्थव्यवस्थेपुढे अनेक आव्हान असल्याचं दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे भारताचा जीडीपी ग्रोथ रेट अजूनही स्थिर असल्याचं दिसून येत आहे. जीडीपी ग्रोथरेट मध्ये घसरण झाल्याने चीनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चीनच्या सरकारकडून जीडीपी ग्रोथ रेट वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परंतु देशांतर्गंत मागणीमध्ये झालेली घट, संकटात सापडलेलं प्रॉपर्टी सेक्टर आणि जागतिक अस्थिरता याचा मोठा फटका हा चीनच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे.

चीनची अर्थव्यवस्था का घसरली?

चीनमध्ये देशांतर्गत मागणीमध्ये प्रचंड घट झाली आहे, लोकांनी पूर्वीच्या तुलनेत खर्च कमी केला आहे. याचा चीनमधील मोठ्या कंपन्यांना प्रचंड फटका बसला आहे. तसेच कंपन्यांना फटका बसल्यामुळे देशात कोणतीही नवीन गुंतवणूक झालेली नाहीये, प्रॉपर्टी सेक्टर देखील संकटात सापडलं आहे. देशांतर्गत गुंतवणुकीमध्ये घट झाल्यामुळे अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे, जीडीपीमध्ये प्रचंड घसरण पहायला मिळत आहे. सोबतच चीनला जागतिक अस्थिरतेचा देखील मोठा फटका बसला आहे. चीनच्या काही सेक्टरवर जागतिक अस्थिरचा मोठा प्रभाव पडल्याचं पहायला मिळत आहे. परंतु दुसरीकडे चीनने आर्टिफिशियल इंटेलिजेंस, इलेक्ट्रॅनिक्स वस्तू आणि हाय-टेक प्रोडक्ट्सची निर्यात वाढवल्यामुळे अर्थव्यवस्थेला थोडासा का होत नाही दिलासा मिळाला आहे.

भारताची जीडीपी किती

जुलाई 2026 मध्ये झालेल्या एमपीसीच्या बैठकीनंतर आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भारताचा जीडीपी ग्रेथ रेट 6.6 टक्क्याच्या आसपास राहू शकतो असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँककडून व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक स्थरावर सध्या प्रचंड अस्थिरता आहे, त्याचा परिणाम हा भारताच्या जीडीपीवर होऊ शकतो, परंतु दिलासादायक बातमी म्हणजे भारताचा जीडीपी हा स्थिर राहील असा अंदाज आरबीआयने वर्तवला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in