• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चित्रपट असावा तर असा, 96 दिवस सर्व शो हाऊसफुल, तिकिटासाठी लागायच्या रांगा, चित्रपटाच्या नावाने विकले जायचे टी-शर्ट

July 25, 2026 by admin Leave a Comment


आजच्या काळात एखाद्या चित्रपटाची लोकप्रियता सोशल मीडियावरील ट्रेंड, बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून मोजली जाते. मात्र, 1980 च्या दशकात सोशल मीडिया नसतानाही एका चित्रपटाने असा इतिहास रचला की त्याच्या नावाचा अक्षरशः देशभरात बोलबाला झाला.

प्रेक्षक वारंवार चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहत होते, सर्व शो हाऊसफुल होत होते आणि बाजारात त्या चित्रपटाच्या नावाचे टी-शर्ट, शर्ट, जॅकेट, बनियन आणि अगदी अंतर्वस्त्रांपर्यंत विकले जात होते. त्या काळात कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी अशी लोकप्रियता अभूतपूर्व मानली जात होती.

क्रांती चित्रपट

1981 साली प्रदर्शित झालेल्या ‘क्रांती’ या चित्रपटाने रिलीज होताच संपूर्ण देशात धुमाकूळ घातला. दिग्दर्शक आणि अभिनेते मनोज कुमार यांच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी तब्बल चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले होते.

त्यांच्या पुनरागमनामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली होती. दमदार कथा, देशभक्तीचा विषय, भव्य सेट्स आणि स्टारकास्ट यामुळे ‘क्रांती’ने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘क्रांती’ हा 1981 मधील सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला. इतकेच नाही तर अनेक वर्षे तो ‘शोले’नंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जात होता.

96 दिवस प्रत्येक शो हाऊसफुल

‘क्रांती’ची लोकप्रियता केवळ पहिल्या काही आठवड्यांपुरती मर्यादित राहिली नाही. हा चित्रपट जवळपास 67 आठवडे, म्हणजेच दीड वर्ष विविध चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होता. एका थिएटरमध्ये तर सलग 96 दिवस प्रत्येक शो हाऊसफुल असल्याची नोंद झाली होती.

चित्रपटाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रेक्षकांना लांबलचक रांगा लावाव्या लागत होत्या. अनेक शहरांमध्ये आगाऊ बुकिंग काही दिवस आधीच पूर्ण होत असे. त्यामुळे अनेकांना तिकीट मिळवण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत होती.

‘क्रांती’ नावाच्या कपड्यांची बाजारात मोठी मागणी

या चित्रपटाची लोकप्रियता चित्रपटगृहांपुरती मर्यादित राहिली नाही. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये व्यापाऱ्यांनी ‘क्रांती’ नावाचे टी-शर्ट, शर्ट, जॅकेट, बनियन आणि अगदी अंतर्वस्त्रेही विक्रीसाठी बाजारात आणली होती.

त्या काळात एखाद्या चित्रपटाच्या नावावर आधारित कपड्यांची अशी विक्री होणे ही अत्यंत दुर्मीळ आणि अभूतपूर्व घटना मानली जात होती. चित्रपटाच्या नावाचा हा ब्रँडसारखा वापर त्या काळातील त्याच्या अफाट लोकप्रियतेचा पुरावा मानला जातो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in