• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चिंताच मिटली… अवघ्या 22 व्या वर्षी 14 हजार कोटींची मालकीण; रातोरात असं काय घडलं?

August 10, 2026 by admin Leave a Comment


केवळ वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी अब्जाधीश होणं एखाद्या स्वप्ना सारखं वाटू शकतं. पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. दक्षिण कोरियाच्या किम जंग युन (Kim Jung-youn) बाबत हे घडलंय. फोर्ब्सच्या 2026च्या वर्ल्ड बिलेनियर यादीत किमचं नाव नोंदवलं गेलं आहे. जगातील सर्वात कमी वयाची महिला टेक अब्जाधीश म्हणून तिचं नाव सर्वात वर आहे. स्टार्टअप सुरू करून तिने एवढी मिळकत मिळवली नाहीये, तर वडिलांनी तयार केलेल्या Nexon गेमिंग कंपनीतून तिला तिच्या वाट्याचा हिस्सा मिळाल्याने ती रातोरात अब्जाधीश झाली आहे.

फोर्ब्सच्या मते, 2026च्या लिस्टमध्ये किम जंग युनची नेटवर्थ सुमारे 1.7 अब्ज डॉलर आहे. तिची संपत्ती 14 हजार कोटीची आहे. किम दक्षिण कोरियाची आहे. तिच्या संपत्तीचा मुख्य सोर्स ऑनलाईन गेमिंग आहे. फोर्ब्सच्या यादीत ती जगातील सर्वात कमी वयाची म्हणजे 22 व्या वर्षी अब्जाधीश झालेली तरुणी आहे. वयाच्या 20 व्या वर्षी अब्जाधीश झाल्याचा विक्रम एमिली वायगट हिच्या नावे आहे. त्यामुळेच किमला जगातील सर्वात कमी वयाची टेक महिला अब्जाधीश म्हणणं अधिक योग्य ठरणार आहे.

वडिलांची कंपनी

किम जंग युनचे वडील किम जंग जू यांनी 1994मध्ये नेक्सॉन कंपनीची सुरुवात केली होती. या कंपनीने ऑनलाइन गेमिंगच्या जगात मोठा बदल घडवून आणलेला आहे. नेक्सॉनने MapleStory, KartRider आणि Dungeon & Fighter सारखे गेम तयार केले. हे गेम जगभरात प्रचंड लोकप्रिय आहेत. फोर्ब्सच्या मते, ही कंपनी 80 हून अधिक लाइव्ह गेम चालवते. 72 हून अधिक देशात त्यांचे यूजर्स आहेत.

किम जंग जू यांनी केवळ गेम बनवण्यावर लक्ष दिलं नाही. तर मोफत गेम खेळता येईल, असं ऑनलाईन गेमिंगचं एक असं मॉडल तयार केलं. नेक्सॉनला Free-to-Play मॉडलचा मोठा खिलाडी मानलं जात आहे. हेच मॉडल नंतर संपूर्ण गेमिंग इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय ठरलं आहे.

अन् पिक्चरच बदललं

किम जंग युनच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल 2022मध्ये आला. तिचे वडील किम जंग जू यांचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुली किम जंग मिन आणि किम जंग युन यांना कुटुंबाच्या कंपनीतील मोठा हिस्सा मिळाला. नेक्सॉनची सर्वात मोठी शेअर होल्डिंग कंपनी NXCमधून दोघींना सर्वाधिक हिस्सा मिळाला. फोर्ब्सच्या मते, दोन्ही बहिणींकडे NXCची भागिदारी आहे. जपानच्या शेअर बाजारात NXC लिस्टेड आहे. किम जंग युनने यात आपली भागिदारी केवळ 9 टक्के असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच, किम जंग युनने नेक्सॉन स्वत: सुरू केली नाही आणि कंपनीचं कामकाजही ती रोज चालवत नाही. फोर्ब्सच्या मते, दोन्ही बहिणी नेक्सॉनच्या ऑपरेशनमध्ये सहभागी नाहीत. त्यांच्या खासगी आयुष्याबाबतची अत्यंत कमी माहिती सार्वजनिक आहे. दोघी बहिणींना अब्जावधीची संपत्ती केवळ वडिलांच्या निधनानंतर वारसा हक्क म्हणून मिळाली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in