
मध्य रेल्वेने चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी २४६ गणपती विशेष ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे. या ट्रेनमध्ये एसी, स्लीपर आणि अनारक्षित अशा १८४ मिश्र स्पेशल ट्रेन असणार आहे. तर ६२ अनारक्षित विशेष ट्रेन असणार आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमानी दरवर्षी कोकणात दोन ते चार दिवस जाऊन गणपती सण साजरा करत असतात. मध्य रेल्वेच्या नियमित ट्रेनचे आरक्षण नुकतेच सुरु होऊन फुल्ल देखील झाले आहे. आता या स्पेशल ट्रेनचे आरक्षण १ , २ आणि ३ ऑगस्ट पासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन सुरु होत आहे.
गणपती विशेष ट्रेनचा तपशील:
१) सीएसएमटी, मुंबई- सावंतवाडी रोड – सीएसएमटी, मुंबई दैनिक विशेष गाडी (३२ फेऱ्या )
- ट्रेन क्रमांक 01103 दि. ११ ते दि. २६ सप्टेंबर या काळात दररोज सीएसएमटी येथून दु. ३.३० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता पोहोचेल. (१६ फेऱ्या)
- ट्रेन क्रमांक 01104 दि. १२ ते दि. २७ सप्टेंबर या काळात दररोज सावंतवाडी रोड येथून सकाळी ४.३५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी, मुंबई येथे त्याच दिवशी दुपारी ४.४० वाजता पोहोचेल. (१६ फेऱ्या)
थांबा: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामथे, सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
डब्यांची रचना : २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply