• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घाटात 600 मिमीपेक्षा जास्त पाऊस, ट्रॅकची खडी वाहून गेली, दरडींमुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग क्षतिग्रस्त, मार्ग कधी सुरु होणार ?

July 6, 2026 by admin Leave a Comment


गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. या पावसात सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक अपघात घडले आहेत. मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावर घाट सेक्शनमध्ये दरडी कोसळल्याने या मार्ग पहाटे पासून ठप्प आहे. या मार्गावर दरड कोसळली तेव्हा तो ट्रेन मार्गस्थ होत्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा ट्रेनचे नुकसान झालेले नसल्याचे मध्ये रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या मार्गाच्या बंद झाल्याने 20 हून जास्त ट्रेन रद्द झाल्या आहेत. अनेक ट्रेनचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने बोर घाटामध्ये काल 600 एमएमपेक्षा जास्त पाऊस पडला.परवा देखील घाट सेक्शनमध्ये 300mm पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीने घाटामधील संवेदनशील जागांवर मध्य रेल्वेने स्टेशनरी पॉईंट्सचा पाहारा लावला होता. त्यांच्याकडे संपर्काच्या आधुनिक यंत्रणा दिलेल्या होत्या.

दरड कोसळली तेव्हा काय झााले ?

ह्या पावसामुळे घाटामध्ये जिथे धोक्याची जागा आहेत या सर्व जागी स्टेशनरी पॉईंट्समेंट स्टेशनरी वॉचमन नियुक्त केले होते. त्यामुळे कोणत्याही अशा घटनांची वेळेत माहिती मिळत असल्याने रेल्वेला पुढील कार्य करणे किंवा मदत पोहचवणे शक्य होते. आज सकाळपासून देखील साधारण पहिल्या चार तासांमध्ये घाटात 160 mm इतका पाऊस पडला आहे. पावसामुळे आधी लोणावळा जवळी ठाकूरवाडी येथे एक दरड कोसळली. त्यानंतर मंकी हिल आणि खंडाळ्याच्या दरम्यान देखील दरड कोसळण्याच्या घटना झाल्या. या घटना लोणावळा आणि कर्जत या दरम्यान झालेल्या आहेत. या अपघाती घटनांमध्ये तिथे स्टेशनरी वॉचमन ठेवल्यामुळे गाडी रोखण्यात आल्याने कुठल्याही गाडीचे किंवा प्रवाशाचे नुकसान झालेले नाही.

ज्यावेळी ही दरड कोसळण्याची घटना घडली तेव्हा घाटामध्ये दोन ट्रेन उभ्या होत्या. दौंडवरून ग्वालैरला जाणारी एक ट्रेन खंडाळा घाटात उभी होती. तर लोकमान्य टिळक टर्मिनसवरून बंगलुरुला जाणारी एक ट्रेन ही ठाकुरवाडी येथे उभी होती. या दोन्ही ट्रेनना सुरक्षितपणे सकाळी सव्वा सहा वाजता लोणावळा आणि कर्जत या स्थानकांवर माघारी आणण्यात आल्याचे मध्य रेल्वे मुख्यजनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.

मुंबई -पुणे इंटरसिटी ट्रेनचा प्रवास बंद

या घटनेमुळे प्रामुख्याने मुंबई आणि पुणे या दरम्यानच्या इंटरसिटी ट्रेनचा प्रवास ठप्प झाला आहे. याशिवाय मुंबईवरून सोलापूरला जाणारी आणि मुंबईवरुन धुळ्याला जाणाऱ्या ट्रेन देखील रद्द करण्यात आल्या आहेत. एकूण 17 ते 20 ट्रेन आतापर्यंत रद्द केलेल्या आहेत. याशिवाय 31 ट्रेनला वळवण्यात आल्या आहेत.

लोणावळा–कर्जत घाट विभाग रेल्वे अपडेट

लोणावळा–कर्जत दक्षिण-पूर्व घाट विभागातील मंकी हिल आणि खंडाळा स्थानकांदरम्यान १२१ आणि १२३ कि.मी. परिसरात दरडी कोसळल्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. दरड कोसळल्याने रेल्वे रुळांवर आलेला मातीचा ढिगारा, दगड आणि मोठे खडक हटविण्याचे काम रेल्वेने सुरु केले आहे. रेल्वेचे अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी आणि यंत्रसामग्रीच्या मदतीने रेल्वेचा मार्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या कामात अडथळे येत असले तरी सुरक्षिततेचे सर्व निकष पाळून हे काम सुरू करण्यात आले आहे. हा मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत.

येथे पाहा पोस्ट –

Work being done at 121 and 123 km between Monkey Hill and Khandala station in Lonavala – Karjat South East Ghats. pic.twitter.com/hNYtMt8A3y

— Central Railway (@Central_Railway) July 6, 2026

06 जुलै  2026 रोजी चार तासात  140 मिमीहून अधिक पाऊस

05 जुलै 2026 रोजी 327 मिमी पाऊस

04 जुलै 2026 रोजी  162 मिमी पाऊस

रद्द झालेल्या ट्रेन

1) 22105 सीएसएमटी – पुणे इंद्रायणी एक्सप्रेस

2)  12169 पुणे – सोलापुर इंटरसिटी एक्सप्रेस

3)  12170 सोलापुर – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस

4)  22106 पुणे – सीएसएमटी इंद्रायणी एक्सप्रेस

5)  12127 सीएसएमटी – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस

6)  12128 पुणे – सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस

7)  11007 सीएसएमटी – पुणे डेक्कन एक्सप्रेस

8) 11008 पुणे – सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस

9)  12124 पुणे – सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्सप्रेस

10)  12123 सीएसएमटी – पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस

11) 12126 पुणे – सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस

12) 12125 सीएसएमटी – पुणे प्रगती एक्सप्रेस

13) 11010 पुणे – सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस

14) 11009 सीएसएमटी – पुणे सिंहगड एक्सप्रेस

15) 11011 सीएसएमटी – धुळे एक्सप्रेस

16) 11012 धुळे – सीएसएमटी एक्सप्रेस

17) 12115 सीएसएमटी – सोलापूर एक्सप्रेस





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
  • पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
  • किल्ले, धरणं, धबधबे, ठाण्यात सगळं बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा तडकाफडकी आदेश; नागरिकांसाठी मोठी सूचना!
  • FD पेक्षाही चांगला परतावा देणाऱ्या योजना; बाजारात LIC चे 5 जबरदस्त प्लान, एकदा वाचाच
  • घाटात 600 मिमीपेक्षा जास्त पाऊस, ट्रॅकची खडी वाहून गेली, दरडींमुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग क्षतिग्रस्त, मार्ग कधी सुरु होणार ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in