• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरमालक भाडेकरूला घरात पार्टी करण्यास रोखू शकतो का? कायदा काय म्हणतो?

July 9, 2026 by admin Leave a Comment


तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल. तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांसोबत घरात छोटीशी पार्टी करायची आहे. परंतु तुमच्या मनात, घरमालकाला घरात पार्टी करण्यास रोखण्याचा अधिकार असतो का, असा प्रश्न निर्माण होत असेल.  घरात पार्टी, वाढदिवसाचा कार्यक्रम करायचा असेल, तर परवानगी घ्यावी लागते का, या प्रश्नाबाबत कायदा काय सांगतो, याविषयी जाणून घेऊयात.

…भाडेकरूला नियम पाळावा लागेल

तुम्ही एखादे घर भाड्याने घेतले असेल, त्यावेळी भाडेकरार लागू होतो. त्यावेळी त्या घराचा वापर करण्याचा अधिकार असतो. याचा अर्थ तुम्ही घरात मित्र किंवा नातेवाईकांना घरी पार्टीसाठी बोलावू शकता. तुम्ही घरात छोटीशी गेट टू गेदर पार्टी ठेवू शकता. फक्त एकच अट असते की, पार्टीदरम्यान कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होता कामा नये. तसेच रहिवाशांना त्रास होईल, अशी पार्टी आयोजित करू नये. तुम्ही सोसायटीच्या नियमांचं पालन करत असाल. त्यावेळी घरमालक घरात पार्टी चालणार नाही, असे म्हणून शकत नाही. परंतु भाडेकरारात नमूद करण्यात आलं असेल की, घरी कोणतीही मोठी पार्टी, कार्यक्रमाचे आयोजन करू नये, तर भाडेकरूला Tenant) नियमांचं पालन करावं लागेल.

भाडेकरू आणि घरमालकाची असते वेगवेगळी जबाबदारी

भाडेकराराचे नियम हे राज्यातील कायदे आणि मॉडेल टेनन्सी अॅक्ट, 2021 या आधारावर चालतात. कायद्यात घरमालक आणि भाडेकरूच्या अधिकार आणि जबाबदाऱ्यांचा उल्लेख असतो. या करारानुसार भाडकरूला शांततेत घर (House) वापरण्याचा अधिकार मिळतो. तर घरमालकाला त्याच्या संपत्तीच्या सुरक्षेचा अधिकार मिळतो. दोन्ही पक्षकारांना त्यांची जबाबदारी पार पाडायची असते.

परिसराची शांतता भंग झाल्यास भाडेकरूवर गुन्हा दाखल होणार 

भाडेकरूच्या पार्टीतील मोठ्या आवाजामुळे शेजाऱ्यांची झोप (Sleep) मोड किंवा परिसराची शांतता भंग होत असेल. भाडेकरूकडून घरात दारू पिऊन धिंगाणा घातला जात असेल. या परिस्थिती शेजारी लोक पोलिसांत भाडेकरूच्या विरोधात तक्रार देऊ शकतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी रात्री 10 वाजल्यानंतर मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यास बंदी असते. त्यामुळे या नियमांचं सक्तीने पालन करावे लागते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेच्या दरवाढीमागे इथेनॉल नाही तर ‘ही’ कारणे, सरकारने घेतलेले मोठे निर्णय काय?
  • मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात सहभागी व्हा, संघाचे प्रचारप्रमुख सुनिल आंबेकर यांचे आवाहन
  • श्रावणातील पुत्रदा एकादशीला चुकूनही करू नका ‘या’ 5 गोष्टी, भात खाण्यापासून तुळस तोडण्यापर्यंत आहे सक्त मनाई
  • विवो कंपनीच्या ‘या’ स्मार्टफोन मॉडेल्सच्या वाढल्या किमती, जाणून घ्या
  • फरशी चमकण्यासोबत घरात दरवळेल सुगंध, स्वयंपाकघरात ठेवलेल्या या गोष्टींपासून बनवा क्लिनर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in