• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गौरव खन्नाच्या पाठीवरील गंभीर चट्टे पाहून भडकले चाहते; ‘खतरों के खिलाडी’च्या निर्मात्यांवर सवाल

August 4, 2026 by admin Leave a Comment


सेलिब्रिटी स्पर्धकांना खतरनाक स्टंट्स करायला लावणारा ‘खतरों के खिलाडी 15’ हा शो सुरू झाला आहे. यामध्ये जबरदस्त अॅक्शन आणि स्टंट्स पहायला मिळत आहेत. मात्र एका घटनेमुळे हा शो सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना आणि करण वाही यांना शोमध्ये स्टंट करताना गंभीर दुखापती झाल्या आहेत. या दुखापतींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात गौरवच्या पाठीवर दुखापतीच्या गंभीर खुणा पहायला मिळत आहेत. हे पाहताच नेटकऱ्यांनी शोवर आणि त्यातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर टीका करण्यास सुरुवात केली. अखेर ही वाढती टीका पाहून निर्मात्यांनी त्यावर मौन सोडलं आहे.

गौरव खन्नाने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्याच्या पाठीवर रबर बुलेट्समुळे झालेल्या जखमा स्पष्टपणे दिसत आहेत. ‘टीव्हीवर पाहतानाही मला त्याच वेदना जाणवल्या. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत वेदनादायी अनुभव होता. आम्ही चारही स्पर्धकांनी हा स्टंट केला आणि माझ्या पाठीवर अजूनही त्याच्या जखमा आहेत’, असं त्याने व्हिडीओवर लिहिलं होतं. गौरवसोबतच करण वाहीनेही त्याच्या जखमा दाखवल्या.

गौरवने शेअर केलेला फोटो

या जखमा पाहून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. शोमध्ये स्पर्धकांच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे की नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला. एका युजरने लिहिलं, ‘हे पाहणंही वेदनादायी आहे. चारही स्पर्धकांच्या पाठीतून रक्त वाहत होतं. गौरवने दुखापतग्रस्त असूनही दुसरा स्टंट केला.’ तर दुसऱ्याने म्हटलंय, ‘हे तर अतिच झालं. निर्माते वेडे झाले आहेत का? स्पर्धकांकडून असे धोकादायक स्टंट करून घेणं योग्य आहे का?’

व्हायरल व्हिडीओवरील टीकेनंतर शोची निर्मिती संस्था ‘बनिजय’चे सीईओ दीपक धर यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “हा शो अजिबात क्रूर नाही, भीती हा निश्चितच त्याचा एक भाग आहे. कारण शेवटी याचं नावच फिअर फॅक्टर असं आहे. पण आम्ही प्रत्येक स्टंट आंतरराष्ट्रीय ठिकाणी चित्रित करतो, जिथे सर्व सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. स्पर्धकांची सुरक्षा हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे.”

गौरव खन्ना हा टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेता आहे. या शोमध्ये त्याने पहिल्या आठवड्यातच तीन स्टंट पूर्ण केले आणि ‘बेस्ट स्टंट ऑफ द वीक’चा किताबही पटकावला. ‘खतरों के खिलाडी 15’चा प्रीमिअर 1 ऑगस्ट 2026 रोजी झाला. कलर्स टीव्हीवर हा शो प्रसारित होत असून जिओ हॉटस्टारवरही तो पाहता येणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
  • लॉन्च होताच ‘निसान’च्या ‘या’ नव्या एसयूव्हीचा धुमाकूळ; पहिल्याच महिन्यात क्रेटा आणि डस्टरचे टेन्शन वाढवले
  • PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या
  • मुंबई पालिका आयुक्तांनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकारली, वंचितचा आरोप; माफीची मागणी!
  • तुमच्या हृदयासाठी कोणते तेल चांगले?, या 5 तेलांचा वापर ठरेल फायदेशीर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in