• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गोमूत्राने शेतकरी होणार मालामाल, १० रुपये लिटरने खरेदी करणार सरकार, दूधानंतर आता गोमूत्र शेतकऱ्यांना ठरणार वरदान…

August 10, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात १० रुपये प्रति लिटर दराने गोमूत्र खरेदीचा पायलट प्रोजेक्ट सुरु झाला आहे. एफपीओद्वारे १५ गावातून रोज ५०० लिटर गोमूत्र एक करुन औषधे तयार केली जाणार आहेत. या योजनेत ३०० महिलांना शेअरहोल्डर बनवून रोजगार दिला जाणार आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या व्हीजन अंतर्गत गो संरक्षण, सैंदिय शेती आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एफपीओ द्वारे १० रुपये प्रति लिटर दराने गोमूत्र खरेदीचा पायलट प्रोजेक्ट सुरु झाला आहे. या प्रयोगाला अनेक भागातही लवकरच लागू केला जाणार आहे.

बुलंदशहराच्या १५ गावातून सुरुवात

बुलंदशहरच्या स्याना तहसीलच्या नरसैना गावात डॉ.प्रवीण यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी उत्पादक संघटनेने ( एफपीओ ) हा प्रकल्प सुरु केला आहे. या अंतर्गत १५ गावांना जोडून गोमूत्र डेअरी आणि स्थानिक केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या व्यवस्थेच्या माध्यमातून सध्या प्रतिदिन ५०० लिटर गोमूत्र एकत्र केले जात आहे. भविष्यात खरेदीचा दर वाढवून २० रुपये प्रति लिटर केला जाण्याची योजना आकारास येत आहे.

गावात 200 लिटरचे टँक

गोमूत्राला एकत्र करता यावे यासाठी गावात २०० लिटर क्षमतेचे विशेष टँक लावण्यात आले आहेत. या पशुपालकांना उत्पादन विकण्यासाठी दूर वर जाण्याची गरज नाही. गावातच सुविधा मिळते. स्थानिक पातळीवर ही सुविधा उपलब्ध झाल्याने गावकऱ्यांना आणि विशेषत: महिलांना या योजनेशी जोडणे सोपे झाले आहे.

गोमूत्रापासून शेतीसाठी औषधे..

एकत्रित केलेल्या गोमूत्रापासून विविध जडी-बुडी मिसळून शेतीसाठी उपयोगी आणि रसायनमुक्त औषधे तयार केली जात आहेत. तयार झालेल्या उत्पादनांना समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जात आहे. गो सेवा आयोगाच्या अध्यक्ष शाम बिहारी गुप्ता यांच्या मते हे मॉडेल रासायनिक उत्पादकांना पर्याय देण्यासह नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे.

300 महिलांना बनवले शेअरहोल्डर

या संपूर्ण आर्थिक मॉडेलमध्ये ग्रामीण महिलांची भूमिका महत्वाची ठरली आहे. सुमारे ३०० महिलांना या मोहिमेत जोडून शेअरहोल्डर बनवण्यात आले आहे. गोमूत्र संग्रहण करण्यात सहकार्य केल्यानंतर महिलांना प्रति लिटर दोन रुपयांचे थेट कमिशन दिले जात आहे.या योजनेने महिलांना गावात राहून नियमित आणि अतिरिक्त उत्पन्नाचे एका नवे साधन मिळाले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in