• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गोड पदार्थ खायची इच्छा झालीये? घरच्या घरी काही मिनिटांत बनवा नारळाचे हे पदार्थ

July 22, 2026 by admin Leave a Comment


बऱ्याच लोकांना जेवणानंतर गोड खायला लागतच. विशेष कार्यक्रमांपासून ते रोजच्या जेवणापर्यंत आपल्यापैकी अनेकांना काहीतरी गोड खायला आवडते. यासाठी बहुतेकजण बाजारात मिळणाऱ्या अनेक मिठाई खरेदी करतात. पण यात साखर आणि फॅटचे प्रमाण जास्त असल्याने आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे घरी सहज बनवता येतील अशा आरोग्यदायी गोड पदार्थ तयार केल्यास चव आणि आरोग्य दोन्ही जपले जाऊ शकते. नारळापासून बनवलेले गोड पदार्थ हा एक उत्तम पर्याय असून, तुम्ही अगदी सहज काही मिनिटांत बनवू शकता.

नारळामध्ये फायबर, आरोग्यदायी फॅट्स, मॅंगनीज, तांबे, लोह आणि पोटॅशियम यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात . तुम्ही रोजच्या आहारात योग्य प्रमाणात नारळाचे सेवन केल्याने ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया सुधारते. जर तुम्ही घरीच चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ बनवू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण नारळापासून काही मिनिटांत बनवू शकणारे गोड पदार्थांची रेसिपी जाणून घेऊयात.

नारळापासून बनवा हे 4 आरोग्यदायी गोड पदार्थ

नारळाचे लाडू

एका पॅनमध्ये किसलेला नारळ आणि कंडेन्स्ड मिल्क किंवा थोडा गूळ टाकून काही मिनिटे शिजवा. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड टाका व थंड करा आणि लहान लाडू बनवा. हा एक चविष्ट ऊर्जा देणारा आणि फायबरयुक्त गोड पदार्थ आहे.

नारळाची खीर

एका भांड्यात गरजेनुसार दूध उकळा, त्यात किसलेला नारळ टाका आणि काही मिनिटे शिजू द्या. चवीनुसार गूळ किंवा साखर आणि वेलची पूड टाका आणि सर्व मिश्रण चांगले मिक्स करा. इच्छित असल्यास तुम्ही यामध्ये सुका मेवा देखी मिक्स करू शकता. ही खीर केवळ चविष्ट नाही, तर अनेक आवश्यक पोषक तत्वे देखील तुमच्या आरोग्याला पुरवते.

नारळ बर्फी

ओल्या नारळाचा किस, दूध, थोडा गूळ किंवा साखर एकत्र मिक्स करा आणि मंद आचेवर शिजवा. मिश्रण घट्ट झाल्यावर ते तेल लावलेल्या ताटावर पसरवून थंड होऊ द्या. घट्ट झाल्यावर त्याला हव्या त्या आकारात कापून घ्या. हा गोड पदार्थ झटपट बनतो आणि चवीलाही खूप उत्तम लागतो.

नारळ-खजूर रोल

मिक्सरमध्ये बिया काढलेले खजूर आणि किसलेले ओले खोबरे घेऊन बारीक करा. एका ताटात हे मिश्रण पसरवा आणि रोल बनवा आणि त्यावर थोडा खोबरे टाका. हा शुगर फ्री गोड पदार्थ नैसर्गिक गोडव्यासोबतच फायबर आणि ऊर्जेचा चांगला स्रोत आहे.

नारळापासून गोड पदार्थ बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

नारळाचे गोड पदार्थ बनवताना, नेहमी ताजा आणि उत्तम प्रतीचा नारळ वापरा. ​​सुका नारळ वापरत असल्यास त्याचा सुगंध आणि ताजेपणा नक्की तपासा. गोड पदार्थांमध्ये अतिरिक्त साखर टाकणे टाळा आणि गूळ किंवा खजूर यांसारख्या नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर करा.

सर्व साहित्य स्वच्छ आणि ताजे असावे. एकदा गोड पदार्थ तयार झाल्यावर पदार्थ जास्त काळ खोलीच्या तापमानावर ठेवू नका ते एका डब्यात काढून फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात ठेवा आणि 1 ते 2 दिवसांच्या आत खा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आम्ही जिंकलो असतो पण तो आडवा आला… शुभमन गिलने कोणाला व्हिलन ठरवलं? सरळ नाव घेत म्हणाला की..
  • Nepal Flood: नेपाळच्या महापुरातून थोडक्यात बचावला अभिनेता; जिथे 12 तासांपूर्वी फोटो काढले, तिथेच आला महाप्रलय
  • रात्र सरताच दिवसा तरंगायला लागले मृतदेह, भूतनाथ तलावात भयंकर प्रकार; 5 दिवसापूर्वी घडलं असं काही की… लोकांमध्ये एकच भीती!
  • ज्याची भीती तेच घडले, नेपाळमधून हादरवणारी माहिती, 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता, महाराष्ट्रातील..
  • IND vs SL: भारतीय संघाचं काम सोप केलं, संधीचं सोनं केलं, तरीही रिकाम्या हाताने घरी जावं लागलं, पडिकलमुळे झाला ‘गेम’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in