• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 21, 2026 by admin Leave a Comment


Gas Cylinder DAC Number : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगातिक पातळीवर उर्जासंकट निर्माण झाले आहे. याचा फटका भारतालाही बसतो आहे. भारतात घरगुती एलपीजी सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आखाती देशांतून येणाऱ्या नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित झाल्याने ही समस्य उद्भवली आहे. या युद्धामुळे भारतात लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नाहीये. विशेष म्हणजे गॅस सिलिंडर बुक करूनही लोकांना चार ते सात दिवस वाट पाहावी लागत आहे. अशा स्थितीत अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा काळाबाजार केला जातोय. सामान्याना लुटले जात आहे. या फसवणुकीला आळा बसावा यासाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने गॅस सिलिंडर बुकिंग आणि डिलिव्हरीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सरकारने नेमका काय निर्णय घेतला?

आता गॅस सिलिंडर बुकिंगवेळी होणार काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने एक नवा नियम आणला आहे. गॅस बुक केल्यानंतर आता प्रत्येक वेळी DAC नंबर म्हणजेच डिलिव्हर ऑथेंटिफिकेशन नंबर मिळेल. हा डीएसी नंबर गॅस डिलिव्हरी करताना तुम्हाला डिलिव्हरी बॉयला द्यावा लागेल. तुमच्याकडे हा डीएसी नंबर नसेल तर तुम्हाला गॅस सिलिंडर मिळणार नाही. विशेष म्हणजे हा नियम लागूदेखील झाला असून देशातील साधारण 92 टक्के गॅस सिलिंडरची डिलिव्हरी अशाच प्रकारे केली जात आहे. या डीएसी नंबरच्या प्रक्रियेत अलिकडेच तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे यात काही अपडेट करण्यात आले होते. या अपडेटमुळे गॅस डिलिव्हरीची प्रक्रिया सोपी होणार आहे.

डीएसी नंबर कसा मिळतो?

दरम्यान, तुम्ही कॉल किंवा एसएमएस करून गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर तुम्हाला डीएसी नंबर मिळतो. त्यासाठी गॅस बुक केल्यानंतर थोडा वेळ वाट पाहावी. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईलवर एक नंबर मिळेल. हाच नंबर डीएसी नंबर असेल. गॅस डिलिव्हरी बॉय तुमच्याकडे गॅस सिलिंडर द्यायला येईल, त्या वेळी तुम्ही हा डीएसी नंबर त्याला सांगावा. त्यानंतरच तुम्हाला गॅस सिलिंडर मिळेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण अमेरिका युद्धात खळबळ! भारतासह तब्बल इतक्या तेल शुद्धीकरण कारखान्यात हाहाकार, षडयंत्र की..
  • Gajkesari Yog : लक्ष्मी कुबेराच्या आशीर्वादाने दुप्पट प्रगती होणार, 5 राशींचे नशीब फळफळणार
  • तुमची ही चूक म्हणजे सापांना घरात येण्याचं आमंत्रणच, साप कधीच घरातून बाहेर जाणार नाहीत
  • संतापला.. रागवला.. आणि ओरडला! तिलक वर्माने सांगितलं हार्दिक पांड्याने काय केलं ते
  • मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक जाणार संपावर, या दिवशी होणार संप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in