• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक जाणार संपावर, या दिवशी होणार संप

April 21, 2026 by admin Leave a Comment


राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे बंधनकारक असल्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. 1 मेपासून कडक अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी आदेश दिले होते. महाराष्ट्र दिनापासून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असे देखील त्यांनी सांगितले. आता याविरोधात रिक्षाचालक एकवटले आहेत.

मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियन या रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने सरकारच्या या निर्णयाविरोधात बंड पुकारला आहे. 4 मे पासून राज्यातील 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे वृत्त 'द टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.

या आंदोलनामुळे सेवा विस्कळीत होण्याची आणि रस्त्यांवरील रिक्षांची संख्या लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता संघटनेने वर्तवली आहे.

युनियनच्या नेत्यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 15 लाख रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये एकट्या मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) 5 लाख चालकांचा समावेश आहे. सरकारने हा आदेश मागे न घेतल्यास दररोज निदर्शने केली जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आंदोलन सुरू करण्यापूर्वी, युनियन 28 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देणार आहेत. १ मे पासून हा नियम लागू होण्यापूर्वीच तो मागे घेण्यात यावा, अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सैफ अली खानचं पहिलं प्रेम होती ही महिला, 60 चित्रपट आणि 40 मालिकांमध्ये केलंय काम
  • भारतात फॅनला तीनच पाते असतात, पण अमेरिकेत चार पाते असं का? 99 टक्के लोकांना माहीत नसणार खरं कारण
  • बेसावध इराणचा मोठा घात झाला, डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटी डाव साधलाच, अमेरिकेचं स्पेशल ऑपरेशन, मध्यपूर्वेतून सर्वात मोठी बातमी
  • आयपीएल स्पर्धेतून आयुष म्हात्रे आऊट होण्याचं कारण कर्णधार ऋतुराज गायकवाड? भर मैदानात काय घडलं?
  • आता थेट 100 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांच्यामुळे मोठी खळबळ; अमेरिका थेट…जग हादरलं!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in