• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गावात रुबाब मारण्यासाठी तो नकली एअरफोर्सचा जवान बनला,पण टेलरने केली पोल खोल..

August 10, 2026 by admin Leave a Comment


पुणे पोलिसांनी नकली एअर फोर्स जवानाला अटक केली आहे. हा जवान एका मृत्यू झालेल्या सैन्य जवानाच्या आयडी कार्डचा गैरवापर करुन रुबाब मारीत होता. परंतू या तोतया एअरफोर्स जवानाचे पितळ एका टेलरच्या जागरुकतेमुळे उघडकीस आले. काय नेमके झाले आणि त्याचे हे ढोंग कसे उघडकीस आले यांची कहाणी थोडी फिल्मी आणि मोठी रंजक आहे.

पुणे पोलिसांनी २६ वर्षीय शुभम अंबुर याला अटक केली आहे. शुभम हा तोतया एअरफोर्सचा अधिकारी बनून रुबाब मारत होता. या आरोपीचे ढोंग एका टेलरने उघडकीस आणले आहे. शुभम हा महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्याचा रहिवासी आहे. शुभम हा पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये एका सलुनमध्ये केशकर्तनाचे काम करतो. मात्र, गावी तो लोकांना आपण भारतीय वायूसेनेत जवान असून सैन्यात नोकरीला लागलो आहे हे सांगायचा.

शुभम याचे पितळ उघड होण्यास एका टेलरची हुशारी कामी आली. शुभम पुण्याच्या लोहगावातील गुरुद्वारा कॉलनीच्या बालाजी टेलरकडे एअरफोर्सचा युनिफॉर्म शिवण्यासाठी पोहचला. तेव्हा त्याने आपण एअरफोर्समध्ये तैनात असून आपल्या युनिफॉर्म शिवायचा आहे असे त्याने त्या टेलरला सांगितले. टेलरने त्याची आणखी चौकशी केली आणि ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. त्यानंतर शुभम याने त्याच्या खिशातून एक आयकार्ड काढून त्या टेलरला दाखवले. कार्ड पाहताच टेलरच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.

या टेलरने आधी देखील एअरफोर्सच्या जवानांचे युनिफॉर्म शिवताना त्यांची ओळखपत्रे पाहिली होती. त्यामुळे त्याला हे आयकार्ड थोडे वेगळे वाटले. त्याला संशय आल्याने त्याने लोहगाव पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल येत शुभमला ताब्यात घेतले.

या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी भारतीय वायू सेनेच्या अधिकाऱ्यांनाही याची कल्पना दिली. त्यानंतर पोलिस आणि एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी मिळून शुभमची चौकशी केली. त्यानंतर त्याने आपणे भारतीय वायू सेनेत काम करीत नसल्याचे कबुल केले. गावात आपला रुबाब वाढावा म्हणून आपण स्वत:ला वायू सेनेत दाखल झाल्याचे सांगायला सुरुवात केल्याचे त्याने सांगितले.

शुभम ज्या एअरफोर्स जवानाचे ओळखपत्र वापरत होता. त्याचा साल २०२२ मध्ये एका रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. आता पोलिस चौकशी करत आहेत की या मृत जवानाचे आयकार्ड त्याच्याकडे कसे पोहचले आणि त्याचा वापर तो नेमका कधी पासून करत आहे. या प्रकरणी एअरफोर्सने लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 शुभम याला तीन दिवसांची पोलिस कोठडी

तक्रार मिळताच पोलिसांनी शुभम अंबुरे याला अटक करुन कोर्टात सादर केले. कोर्टाने आरोपी शुभम याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. आता पोलिस चौकशी करत आहे की शुभम याने कोणा – कोणाला तो वायू सेनेत असल्याचे सांगितले ? त्याने वायूसेनेची वर्दी आणि मृत जवानाचे ओळखपत्र मिळवण्यासाठी कोणाची मदत घेतली याची देखील चौकशी केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in