• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गरीब आहे नाही तर फोनच फोडला असता, अनन्या पांडेचं भरतनाट्यम पाहून चाहते संतापले, Video व्हायरल

May 25, 2026 by admin Leave a Comment


Ananya Pandey : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता लक्ष्य लालवानी यांचा प्रमुख भूमिका असलेला ‘चांद मेरा दिल’ हा रोमँटिक ड्रामा चित्रपट 22 मे 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटातील भावनिक कथा, कलाकारांचा अभिनय आणि कॉलेज रोमान्सचा ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच, अनन्या पांडेच्या एका डान्स सीनमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.

चित्रपटात एका तरुण प्रेमी युगुलाची कथा दाखवण्यात आली आहे. कॉलेजमध्ये प्रेमात पडलेले हे जोडपे लग्नाआधीच आलेल्या प्रेग्नन्सीमुळे आयुष्यातील मोठ्या जबाबदाऱ्यांना सामोरे जाते. नात्यात वाढणारे गैरसमज, भावनिक ताण आणि बदलणारे आयुष्य या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या नात्यावर होताना दाखवण्यात आला आहे. या भावनिक कथेमुळे अनेकांनी कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

गरीब नसतो तर फोन फोडला असता

मात्र, चित्रपटातील एका गाण्यात अनन्या पांडेने सादर केलेल्या ‘भरतनाट्यम’ डान्सवरून इंटरनेटवर संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये पारंपरिक भरतनाट्यम शैलीला मॉडर्न म्युझिक आणि फ्यूजन कोरिओग्राफीसोबत सादर करण्यात आले आहे. पार्श्वभूमीत नटराजाची मूर्ती दिसत असताना अनन्या आधुनिक शैलीत नृत्य करताना दिसते आणि याच गोष्टीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

एका युजरने डान्सचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, कोणी तरी अनन्या पांडेला थांबवा, तर एकाने गरीब आहे नाही तर फोन फोडला असता अशी कमेंट केली आहे. तर आणखी एक जणाने ती भरतनाट्यमचा आणखी नाश करण्याआधी. आणखी एका युजरने, हे पाहून माझ्या कानांतून रक्त येत आहे अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. अनेक नेटिझन्सनी हा डान्स पारंपरिक भारतीय शास्त्रीय नृत्यकलेचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

कमेंट्सचा वर्षाव

प्रसिद्ध कोरिओग्राफरअनिता रत्नम यांनीही या क्लिपवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, ही क्लिप पाहताना असे वाटले जणू भरतनाट्यमला एखाद्या भयानक गैरसमजुतीने ओलीस ठेवले आहे. विस्कळीत हातवारे आणि कॅमेऱ्याच्या अनियमित हालचालींमध्ये नृत्य स्वतःच शांतपणे तिथून निघून गेले आहे.

Someone needs to stop Ananya Pandey ji before she further destroys Bharatanatyam.

That audacity to have Nataraja idol in the background and perform like this…😭😭😭 pic.twitter.com/ljg0SLNvAm

— Incognito (@Incognito_qfs) May 24, 2026

त्या पुढे म्हणाल्या, भरतनाट्यम ही कला तंत्र, नियंत्रण, परंपरा, भूमितीय अचूकता, संगीताची जाण आणि भावनिक खोली यावर आधारित आहे. पण या क्लिपमध्ये ती एखाद्या लग्नाच्या गाण्यासारखी दाखवली गेली आहे. जणू हलक्या भूकंपात शूटिंग झाले आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, या सादरीकरणाला स्वतःच्या चुकीची जाणीवही नाही.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in