• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गणेशोत्सवासाठीचे नियमित रेल्वे गाड्यांचे बुकींग फुल, कोटा कमी आणि दलालांची घुसखोरी, चाकरमानी हवालदील…

July 14, 2026 by admin Leave a Comment


गणेशोत्सवासाठी चाकरमानी आपल्या गावी कोकणात गणेश चतुर्थीच्या दोन ते दिन दिवस आधी जातात. कोकणात रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दरवर्षी रेल्वे जादा गाड्या सोडत असते. यंदा कोकण मार्गावरील नियमित रेल्वे गाड्यांचे आरक्षण १३ जुलै पासून सुरु झाले आहे. यंदा नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होताच अवघ्या काही मिनिटांत फुल झाले आहे. अनेक महत्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्ट फुल झाली असून हाती भलीमोठी प्रतिक्षायादी पडत आहे. गणपती रेल्वे आरक्षणात ओपनिंग कोटा कमी आणि दलालांची घुसखोरी यामुळे प्रवाशांना तिकीट मिळत नाही.

पारदर्शकता एकसूत्रीपणा नाही…

मुळात रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या संख्येप्रमाणे,त्या एका डब्याच्या बर्थच्या संख्येप्रमाणे एकूण बर्थची संख्या आणि प्रत्यक्षात आरक्षणाच्या वेळी उपलब्ध बर्थची संख्या फारच कमी असते त्यामुळे काही सेकंदात तिकीट बुक करताना रिग्रेट असा संदेश येतो. उदा. 20111 मुंबई मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये एकूण सर्व बर्थ 1069 आहेत. पण प्रत्यक्षात 469 बर्थचेच आरक्षण उपलब्ध असते.उरलेले VIP आणि तत्काळ बुकिंगसाठी राखीव असावे.पण मुद्दा हा आहे की असा राखीव कोटा एकूण बर्थच्या किती टक्के असतो ते स्पष्ट केलेले नाही. रिग्रेट होते वेळी नक्की शेवटचे वेटींग तिकीट किती असते 200, 300, 400 हे देखील स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे या रेल्वे आरक्षणात आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय असेच दिसत अशी प्रतिक्रीया प्रवासी बळीराम राणे यांनी दिली आहे.

पुढील आरक्षण कधी आणि किती तारखेला…

गणेश चतुर्थीला कोकण रेल्वे मार्गावर कोकणकन्यासह अन्य नियमित धावणाऱ्या ट्रेनचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू झालेले आहे. तसेच गौरीच्या आगमनाला जाणाऱ्या कोकणवासीयांची संख्याही मोठी आहे. यंदा १७ सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन आणि १८ सप्टेंबरला गौरीपूजन आहे. या १७ सप्टेंबरला सुटणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण १९ जुलै रोजी होणार आहे.

बाप्पाच्या आगमनाची ओढ चाकरमान्यांना लागली आहे. कोकणात किंवा गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे आरक्षणाचे वेळापत्रक आले आहे. रेल्वे तिकीट बुकिंगच्या या महत्त्वाच्या तारखा नक्की लक्षात ठेवा!

आरक्षण रोज सकाळी ठीक ८:०० वाजता सुरू होईल.

प्रवासाची तारीख ➡ आरक्षण सुरू होण्याची तारीख:

११ सप्टेंबर (शुक्रवार) ➡ १३ जुलै २०२६

१२ सप्टेंबर (शनिवार) ➡ १४ जुलै २०२६

१३ सप्टेंबर (रविवार) ➡ १५ जुलै २०२६

१४ सप्टेंबर (सोमवार – गणेश चतुर्थी) ➡ १६ जुलै २०२६

१५ सप्टेंबर (मंगळवार) ➡ १७ जुलै २०२६

१६ सप्टेंबर (बुधवार) ➡ १८ जुलै २०२६

१७ सप्टेंबर (गुरुवार) ➡ १९ जुलै २०२६

१८ सप्टेंबर (शुक्रवार) ➡ २० जुलै २०२६



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिट चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन
  • सलमान खानच्या या व्हिडीओने जिंकले लोकांचे मन, तो व्हिडीओ व्हायरल होताच काैतुक, भिंतीवर..
  • Mohan Bhagwat : आज रात्री मोहन भागवत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथून करणार संबोधित
  • तिला एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून नागपुरात आणा… महिलेची काठमांडूत बिघडली तब्येत; कुटुंबीयांचा फडणीस, गडकरींकडे टाहो
  • सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीने शेअर केलेत फोटो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in