• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गणरायाच्या कृपेने धन, सुख, समृद्धी आणि संकटांपासून मिळेल मुक्ती, ‘हे’ उपाय घ्या जाणून

May 22, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मात प्रत्येक देवतेला एक विशिष्ट महत्त्व आहे. प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार ठरावीक देवांची पूजा करतात. अशात गणरायाच्या भक्तांची संख्या अधिक आहे. हिंदू धर्मात, आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट देवतेला समर्पित असतो. त्यानुसार, बुधवार हा विघ्नहर्ता आणि प्रथम भक्त असलेल्या गणपतीला समर्पित आहे. या दिवशी विधीनुसार गणपतीची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने तो लवकर प्रसन्न होतो. बुधवारी गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळाल्यास तुमच्या घरात धन, सुख आणि समृद्धी नांदेल आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. शास्त्रांमध्ये बुधवारी करण्यासाठी काही विशेष उपाय सांगितले आहेत. तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बुधवारी करायचे 5 सोपे उपाय येथे दिले आहेत.

गणरायाला नैवेद्य अर्पण करा: बुधवारी गणपतीची पूजा करताना गुळापासून बनवलेला मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करा. हा उपाय केल्याने विवाहासंबंधित सर्व प्रकारचे अडथळे आणि समस्या लवकरच दूर होतील असं म्हणतात.

गरिके आणि मोदक: बुधवारी गणपतीला अत्यंत प्रिय दुर्वा अर्पण करा. यासोबतच, गुळाचा लेप लावलेला मोदकही नैवेद्य म्हणून द्या. असे केल्याने घरातील आर्थिक अडचणी आणि समस्या दूर होतील.

मोराचे पीस : बुधवारच्या शुभ दिवशी घरात मोराचे पीस आणणे खूप चांगले आहे. सर्वप्रथम हे मोराचे पीस भगवान कृष्णाला अर्पण करून त्याची पूजा करा. त्यानंतर ते तुमच्या घरातील तिजोरीत किंवा कपाटात, जिथे तुम्ही पैसे ठेवता, तिथे सुरक्षितपणे ठेवा. या उपायामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील आणि आर्थिक प्रगती होईल.

बासरी: बुधवारी घरी नवीन बासरी आणा. स्नान करून स्वतःला स्वच्छ केल्यानंतर, भक्तिभावाने बासरीची पूजा करा. पूजेनंतर थोडा वेळ बासरी वाजवा. असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतील आणि सकारात्मक ऊर्जा घरात येईल.

भगवान श्रीकृष्णाची विशेष पूजा: बुधवारी, केशर घातलेल्या दुधाने भगवान श्रीकृष्णावर अभिषेक करा. त्यानंतर देवाला लोणी, खडीसाखर, पिकलेली केळी, केशर आणि पेढे अर्पण करा. असे केल्याने भगवान श्रीकृष्णाची संपूर्ण कृपा तुमच्यावर होईल, असा विश्वास आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ
  • अमराठी रिक्षा चालकांना दणका बसणारच, कारवाई कशी होणार? मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली A टू Z माहिती दिली
  • कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in