• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खासदार संजय जाधव यांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ, उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट..

July 27, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेबद्दल लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. त्यानंतर ठाकरे गटाने पक्षातील सर्व खासदारांना बैठकीसाठी व्हिप जारी केले. या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारली. कारणे दाखवा नोटीस पक्षाने यांना पाठवली. यानंतर 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या खासदारांपैकी एक परभणी लोकसभेचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव हे देखील होते. अनेक वर्ष संजय जाधव शिवसेना ठाकरे गटासोबत होते. अगोदर आमदार आणि त्यानंतर सलग तीन वेळा खासदार म्हणून ते निवडून आले. मात्र, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत त्यांनी एकनाथ शिंदे याचा हात पकडला.

लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यात संजय जाधव यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे म्हणून संजय जाधव यांची ओळख होती. त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर स्वत: उद्धव ठाकरे परभणीला पोहोचले आणि सभेमध्ये त्यांनी संजय जाधव यांच्यावर जोरदार टीका केली. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे.

शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली असली तरीही संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. संजय जाधव यांनी शेअर केलेल्या या पोस्टनंतर विविध चर्चांना उधाण आले. संजय जाधव हे कट्टरशिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरे यांनी परभणीत येऊन आपल्यावर टीका केली, हा राग मनात न धरता संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

संजय जाधव यांनी शिवसेना ठाकरे गट सोडताना म्हटले होते की, पक्षाकडून बळ मिळत नव्हते. शिवाय मतदार संघात काम करण्यासाठी निधीचीही समस्या होती. परभणी आणि हिंगोलीत ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही शिवसेना ठाकरे गट सोडला. संजय जाधव यांचे परभणी मतदार संघात मोठे वर्चस्व आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in