• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे की शिंदे नक्की कोणासोबत? मोठी माहिती पुढे, थेट..

June 18, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला. उद्धव ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गळ्याला लागले. हेच नाही तर स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रही दिले. याबाबत माहिती कळताच संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई देखील दिल्लीत सक्रिय झाले. एकनाथ शिंदे राजस्थान आणि नंतर दिल्लीत होते. राजस्थानमध्ये त्यांनी लोकसभा अध्यक्षांनी भेट घेतली. शिवसेनेचे तब्बल 6 खासदार सोडून जाणार असल्याचे कळताच मोठी खळबळ उडाली. हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का आहे. एकाच वेळी 6 खासदार जाण्याने पक्षाला मोठी खिंडार पडू शकते. यानंतर शिवसेनेने आपल्या खासदारांना व्हिप जारी केले. जर या व्हिपनंतर खासदार बैठकीला उपस्थित राहिले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. नक्की कोण कोण खासदारसोबत आहेत, हे तपासण्यासाठी शिवसेनेने व्हिप जारी केले. खासदारांना या बैठकीत सहभागी व्हावेच लागेल.

काल दावा केला जात होता की, हे 6 खासदार दिल्लीतच आहेत. संजय राऊत यांनी दिल्लीत पक्षातील नेत्यांसोबत पत्रकार परिषद घेत मोठे दावे केले. हे खासदार शिवसेना ठाकरे गट सोडून नक्की का जात आहेत आणि त्यांच्यावर कशाप्रकारचा दबाव टाकला जात आहे, हे सांगितले. ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत मोठा धक्कादायक खुलासा संजय राऊत यांनी केला.

कोर्टात सुरू असलेल्या केसचा निकाल तुमच्याबाजूने लावला जाईल, फक्त तुम्ही सही करा म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे राऊतांनी म्हटले. ओमराजे निंबाळकर यांनी काल या चर्चांवर स्पष्ट केले की, मी पुण्यात आहे. मी दिल्लीत नाही. मात्र, यादरम्यान त्यांनी शिवसेना ठाकरे गटातच आहे का यावर भाष्य करणे टाळले. 20 जूनला सर्वकाही स्पष्ट करेल, असे त्यांनी म्हटले.

यासोबतच लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात ओमराजे निंबाळकर यांची सही देखील नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर नक्की ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत की, शिंदेंच्या शिवसेनेत याबाबत संभ्रम निर्माण झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला असून एकनाथ शिंदेंचा हात पकडला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in