• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खासदारांनंतर आता आमदार फुटणार? भाजपच्या बड्या नेत्याचे उद्धव ठाकरेंच्या पक्षाबाबत मोठं विधान

June 25, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी सावध भूमिका घेत आमदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला काही आमदारांनी दांडी मारली होती. अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आता आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार फुटू शकतात असं विधान केलं आहे. राणे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

काय म्हणाले राणे?

नारायण राणे यांनी म्हटले की, ‘ऑपरेशन झालं ना, सहा खासदार इकडून तिकडे गेले ना. आमचा हेतू साध्य झाला, कुठून काय कोणी केलं कशाला काढता. हे सर्व लोकशाहीसाठी धोकादायक आहे की नाही हे परिस्थितीनुसार कळेल. सर्व टायगर भाजपमध्ये आले. ठाकरेंकडे आमदार आहेत कुठे? सध्या तरी त्यांच्याकडे तीनच खासदार आहेत, ते काही उद्धव ठाकरेंना सोडणार नाहीत. त्यांना आम्ही भाजपमध्ये घेणार नाही आम्ही माणूस बघून घेतो.’

आमदारही फुटणार

पुढे बोलताना राणे यांनी म्हटलं की, पुढचा नंबर आमदारांचा लागेल. खासदारांना जो काही मोबदला मिळाला, आता आमदार म्हणणार आम्हाला मिळू दे राजकीय वर्चस्व. उद्धव ठाकरेंना सध्या बरं नाहीये, जाऊ दे ना त्यांना सोडा. तीन खासदारांना त्यांना घेऊन बसू द्या ना. बाळासाहेबांची आठवण मला येते, उद्धवची नाही. वाईट वाटतं जो पक्ष मी सुरुवातीपासून पाहिला, त्याचा आज अस्त होताना मला बरं वाटत नाही.

6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षात फुट पडल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार संजय दिना पाटील, खासदार संजय जाधव, खासदार संजय देशमुख, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकेरेची साथ सोडली असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता नारायण राणे यांनी आमदार फुटणार असल्याचाही दावा केला आहे, त्यामुळे आता आगामी काळात उद्धव ठाकरे यांनी आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in