• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, घेतला सर्वात मोठा निर्णय,आता थेट उद्यापासूनच….

June 20, 2026 by admin Leave a Comment


उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांना देखील एकनाथ शिंदे यांनी सहज फोडल्यानंतर काल उद्धव ठाकरे यांनी वर्धापन मेळावा साजरा केला.षण्मुखानंद येथे झालेल्या या हिरक महोत्सवी वर्धापन दिनाला उद्धव ठाकरे यांनी भाजपा पेक्षा काँग्रेस बरा असा नारा दिला होता. उद्धव ठाकरे यांनी तिकीट देऊन मशाल चिन्हांवर निवडून आणलेल्या सहा खासदारांनी दोन वर्षांसाठी विकासासाठी भाजपाची कास धरली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आता कामाला लागले आहेत.

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपला पहिला दौरा जाहीर केला आहे. उद्या उद्धव ठाकरे यांनी फुटलेले खासदार संजय दिना पाटील जेथून निवडून आले त्या ईशान्य मुंबई लोकसभेतून आपला दौरा सुरु करणार आहेत. उद्या सायंकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे भांडुप येथील जुन्या जाणत्या शिवसेना कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी राज्यातही दौर आयोजित केलेला आहे. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा आयोजित केला आहे. 27, 28 आणि 29 जून रोजी उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात यवतमाळ पासून सुरू होणार आहे.तर शिर्डीत या दौऱ्याचा शेवट होणार आहे.ईशान्य मुंबई, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, शिर्डी या सहाच्या सहा मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करणार असून या दौऱ्यांची सुरुवात ईशान्य मुंबई पासून केली जाणार आहे.

असा असणार दौरा

27 जून – यवतमाळ आणि हिंगोली

28 जून – परभणी आणि धाराशिव

29 जून – शिर्डी

उद्धव ठाकरे धाराशिव लोकसभा बैठक अपडेट

गेले त्यांचा विचार करत बसू नका पुन्हा जोमाने काम करा संघटना बांधणी करा अशा संदेश उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील शिवसैनिकांना दिला आहे. जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ज्यांची लढायला तयारी आहे त्यांना सोबत घ्या पक्ष मजबूत करा असेही ते म्हणाले आहेत. संघर्ष करण्याची ज्यांची तयारी त्यांना सोबत घेऊन संघटना बांधणी करा असा आदेश उद्धव ठाकरे यांनी धाराशिव लोकसभा बैठकीत दिला आहे.

उद्धव ठाकरे साहेब यांनी आजच्या बैठकीत मार्गदर्शन केल्याचे माजी आमदार रमेश कोरगावकर यांनी सांगितले. रक्ताचे पाणी करून एका – एका व्यक्तीसाठी काम केले आहे. काही लोकांनी भाजपच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांना निवडून दिले असून त्यांना जाण्याचा कोणताच अधिकार नव्हता. काँग्रेस जागा मागत होते पण आम्ही खेचून घेतली त्याचे आम्हाला काय फळ मिळाले ? त्याचा आम्ही निषेध केला असल्याचे कोरगावकर यांनी सांगितले. उद्या साहेब घाटकोपर, भांडुपला भेट देतील. त्यांच्या आदेशाने आम्ही काम केले पण काही खासदार फुटल्याने आता मतदाराना भेटायला ते येणार आहेत असेही ते म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in