• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खान कुटुंबियांचा जावई असं काय बोलून गेला, ‘त्यांच्या समोर कायम झुकलेला असतो..’, 11 वर्षांनंतर मोठा खुलासा

July 21, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील प्रतिष्ठित खान कुटुंबाचा जावई आणि अभिनेता आयुष शर्मा पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. खुद्द आयुष याने त्याच्या खासगी आयुष्यावर मोठे खुलासे केले आहे. सांगायचं झालं तर, सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिच्यासोबत लग्न केल्यानंतर अनेक नको त्या चर्चा रंगल्या… बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख भक्कम करण्यासाठी सलमानच्या बहिणीसोबत लग्न केल्याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या. पण लग्नाच्या 11 वर्षांनंतर आयुष याने रंगणाऱ्या चर्चांवर मोठा खुलासा केला आहे. आयुष म्हणाला, माझ्याबद्दल ज्या चर्चा रंगतात, त्याचा मला काहीच फरक पडत नाही…, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आयुष याने होणाऱ्या ट्रोलिंगवर मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, सासरे सलीम खान यांच्यासोबत असलेल्या नात्यावर देखील आयुष याने सांगितलं आहे…

नात्याला सिद्ध करण्याची गरज नाही – आयुष शर्मा

आयुष शर्मा म्हणाला, ‘आमच्या लग्नाला 11 वर्ष झाली आहे. आम्हाला 10 वर्षांचा मुलगा आहे आणि 6 वर्षांची मुलगी आहे. या 11 वर्षांमध्ये मी तीन सिनेमांमध्ये काम केलं आणि त्यामधील एकही ब्लॉकबस्टर ठरली नाही. अशात माझ्या करियरला आणि कुटुंबा जोडणं योग्य नाहीय.. याच गोष्टींच्या आधारावर लोकं वेग-वेगळं मत व्यक्त करतात आणि त्यानंतर हळू – हळू एक गोष्ट तयार होते…’, पण अभिनेत्याने प्रत्येक आरोपांवर उत्तर देण्यास सुरुवात केली तर, तो त्यांच्या वैवाहिक जीवनाचा अपमान असेल… याच कारणामुळे आयुष याला नात्याला कोणासमोर सिद्ध करण्याची इच्छा नाही.

सलीम खान यांच्यावर आयुष काय म्हणाला?

आयुष म्हणाला, ‘आजपर्यंत मला त्यांना ‘डॅड’ बोलण्याची हिंमत झाली नाही. माझ्या मनात त्यांच्यासाठी इतका सन्मान आहे की, मी त्यांना फक्त ‘सलीम साहब’ बोलतो… ते एक दिग्गज आहेत, ‘दिवार’, ‘शोले’, ‘जंजीर’ यांसरख्या सिनेमांचा मी मोठा फॅन आहे… त्यांच्यासमोर माझी मान कायम झुकलेली असते. त्यामुळे त्यांना ‘पापा’ किंवा ‘डॅड’ बोलण्यास वेगळं वाटतं… सलीम खान कायम गप्पा मारत असतात आणि मी त्यांना फक्त ऐकत असतो. त्यांच्यासोबत स्वतः जाऊन बोलण्याची हिंमत माझी कधी झालीच नाही. कारण माझ्या मनात त्यांच्यासाठी फार मोठं स्थान आहे.’, असं देखील आयुष म्हणला.

आयुष शर्मा आणि अर्पिता शर्मा यांचं लग्न

सांगायचं झालं तर, अर्पिता, सलीम खाम आणि हेलन यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. 18 नोव्हेंबर 2014 मध्ये हैदराबाद येथील एका पॅलेसमध्ये अर्पिता आणि आयुष यांचं मोठ्या थाटात लग्न झालं. त्यानंतर दोघांनी मुलगा आहिल आणि मुलगी आयत यांचं जगात स्वागत केलं. आयुष शर्मा हा हिमाचल प्रदेशातील एका राजकीय कुटुंबातील आहेत आणि माजी केंद्रीय मंत्री सुख राम हे त्यांचे आजोबा होते.

 

 

 

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क…
  • बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’
  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?
  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in