• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

क्रिती नंतर आता सेलिना जेटली निशाण्यावर, रक्षाबंधन लूकवरून गदारोळ ! डीपनेक ब्लाऊज घातल्याने भडकले नेटकरी

August 28, 2026 by admin Leave a Comment


आज रक्षाबंधन.. देशभरात हा सण उत्साहाने साजरा झाला. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिला तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. रक्षाबंधनानिमित्त मुंबईत एका खास इव्हेंटला सेलिना हिने हजेरी लावली. फ्लोरल साडी नेसलेल्या सेलिनाने लाल रंगाचा मॅचिंग डीपनेक ब्लाऊज घातला होता. मात्र तिचा हाच पेहराव अनेकांना रुचला नसून त्यामुळेच सोशल मीडियावर घमासान माजलं असून काही युजर्सनी तिला ट्रोल करत कपड्यांवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सेलिनाचा हा लूक सध्या बराच चर्चेत आला आहे.

क्रिती सनॉन नंतर सेलिना निशाण्यावर

अभिनेत्री क्रिती सनॉनच्या ब्रालेट टॉपवरून सोशल मीडियावर नुकताच मोठा वाद झाला होता. रक्षाबंधनानिमित्त एक जाहिरात प्रदर्शित झाली होती, पण त्या जाहिरातीत क्रितीने ज्या प्रकारचे कपडे घातले त्यामुळे वाद पेटला होता. अनेकांनी तिच्यावर निशाणा साधत टीकास्त्र सोडलं होतं. हा विवाद काही शमण्याची चिन्हं दिसत नव्हती, अखेर त्या कंपनीने माफी मागत ती जाहिरातच मागे घेतली होती. मात्र क्रितीला बरंच ट्रोल करण्यात आलं. तो वाद शांत होतो ना होतो तोच आता सेलिना जेटलीचा रक्षाबंधन लूक वादाच्या केंद्रस्थानी असून नेटीजन्सनी तिच्यावर निशाणा साधला. हिंदू सणांचा परंपरांचा मान न राखल्याचा आरोप अनेकांनी सेलिनावर केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Celina Jaitly (@celinajaitlyofficial)

नेटकऱ्याच्या कमेंट्स

एका युजरने X वर यासंबंधी पोस्ट केली. ‘रक्षाबंधनसारख्या सणाच्या दिवशी सेलिनाचा पोशाख संस्कृती आणि परंपरांना धक्का देणारा आहे’ असं त्याने लिहीलं. एवढंच नव्हे तर त्या यूजरने तिच्या लूकबाबत बिंदी, सिंदूर, बांगड्या आणि इतर पारंपरिक प्रतीकांचाही उल्लेख केला. तर दुसऱ्या एका युजरने ही याच मुद्यावरून कमेंट केली. ‘सणांवरून आधीच वाद सुरू असताना बॉलिवूड वाले वारंवार तीच चूक का करतायत ? ‘ असा सवाल त्याने उपस्थित केला. सण साजरं करणं ही चांगलीच गोष्ट आहे; मात्र त्यातील परंपरा आणि लोकांच्या भावनांचाही आदर करणंही महत्वाचं असल्याचं त्याने म्हटलं.

तर आणखी एका सोशल मीडिया यूजरने सेलिनाच्या कपड्यांवर टोमणा मारला. कमी कपडे घालणं ही कदाचित तिच्यासाठी रोजचीच गोष्ट असावी, म्हणूनच तिला यात काही वावगं वाटल नसेल, असं त्याने सुनावलं. मात्र, सोशल मीडियावर सुरू असलेल्या या ट्रोलिंगवर सेलिना जेटलीने अद्याप कोणतीही रिॲक्शन दिली नाही.

भावासाठी लिहीली इमोशनल पोस्ट

एकीकडे सेलिना तिच्या लूकमुळे ट्रोल होत असतानाच, दुसरीकडे तिने रक्षाबंधनानिमित्त भावाच्या आठवणीत एक भावूक पोस्ट लिहीली. सेलिनाचा भाऊ आणि निवृत्त मेजर विक्रांत जेटली सध्या अबू धाबीमध्ये ताब्यात आहे. रिपोर्ट्सनुसार, सप्टेंबर 2024 पासून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आरोपांमुळे त्यांना ताब्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र, या प्रकरणाची संपूर्ण माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही. आपल्या भावाला परत आणण्यासाठी सेलिना बऱ्याच काळापासून सातत्याने प्रयत्न करत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Celina Jaitly (@celinajaitlyofficial)

 





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in