• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

क्रिकेट जगतात मोठी खळबळ, सेक्सटॉर्शनमध्ये महिला क्रिकेटपटू पकडली, आधी चॅट नंतर…

April 23, 2026 by admin Leave a Comment


क्रिकेट जगतात मोठी खळबळ माजवणारी एक बातमी समोर आली आहे. सेक्सटॉर्शन आणि खंडणी प्रकरणात जम्मू काश्मीरची महिला क्रिकेटपटू आणि तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आल्याचे समोर आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेने जम्मू आणि काश्मीर टी-20 लीगशी संबंधित एका महिला क्रिकेटपटूला तिच्या भावासह कथित सेक्सटॉर्शन आणि खंडणी प्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनाही नवी दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. फरखांदा अझीझ खान (वय 30 ) आणि तिचा भाऊ बाझिल अझीझ खान (वय 27) अशी अटक केलेल्या दोघांची ओळख पटली आहे. तर त्यांचा साथीदार असलेल्या उद्दीन इम्तियाज वानी (वय 22), याला जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथून अटक करण्यात आली. फरखांदा खान ही जम्मू काश्मीरची राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. ती महिला टी-20 लगीमध्येही सहभागी झाली होती अशी माहिती समोर आली आहे.

ओळख वाढवत चॅटिंग, अश्लील संभाषण, नंतर…

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार इसम 28 वर्षांचा असून तो कुलाबा येथे राहतो. 2024 साली हा इसम पश्चिम उपनगरात रहात होता, तेव्हा फरखांदा खानशी त्याची ओळख झाली. मोबाईल चॅट्समधून त्यांची ओळख हळूहळू वाढली, मात्र त्यानंतर आरोपीने कथितरित्या त्याच्याशी अश्लील संभाषण सुरू केले. एवढंच नव्हे तर नंतर पीडित व्यक्तीची ओळख, तिचा सहकारी उद्दीन इम्तियाज वानी आणि तिचा भाऊ बाझिल खान यांच्याशी करून दिली.

2024 साली आर्थिक गरजेचं कारण देत फरखांदाने तक्रारदार व्यक्तीकडे पैशांची मागणी केली. मात्र जेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा फरखांदा हिने त्याला , त्यांचे खाजगी चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी दिली. यामुळे पीडित व्यक्ती दबावाखाली आली आणि त्याने 30 एप्रिल 2024 ते 13 जानेवारी 2026 या काळात, 32 बँक व्यवहारांद्वारे फरखांदाच्या बँक अकाऊंटमध्ये तब्बल 23. 61 लाख रुपये ट्रान्सफर केले.

या रकमेचा मोठा भाग हा, उद्दीन इम्तियाज वानीच्या खात्यात वळवण्यात आला होता असं तपासात उघड झालं. एवढंच नव्हे तर याव्यतिरिक्त, काही रक्कम फरखांदाचे वडील अब्दुल अझीझ खान यांच्या बँक खात्यातही आढळली. आमच्याकडे तुझ्या आणि फरखांदाच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट आहेत, असे सांगत वानी आणि बाझिल खान यांनी तक्रारदाराला रुंगवासासह गंभीर परिणामांची धमकी दिली होती, असाही आरोप करण्यात आला. या धमक्यानंतर तक्रारदाराने जानेवारी 2026 मध्ये आरोपीला अतिरिक्त 40 लाख रुपये ट्रान्स्फर केले. मात्र ब्लॅकमेलिंग न थांबल्याने अखेर त्याने पोलिसांत जात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास करत फरखांदा हिच्यासह आणखी दोन जणांना बेड्या ठोकून अटक केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सून म्हणून आलीस आणि वेश्या होऊन…, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘या’ सिनेमामुळे उडालेली सर्वत्र खळबळ
  • रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्तीच्या वादावर रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला, “दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा..”
  • माझ्या सन्मानासाठी 8 महिलांची फाशी थांबवली… डोनाल्ड ट्रम्प यांचा तो दावा, इराणकडून थेट तोंडावरच..
  • एसी सुरू असताना रूममध्ये पाण्याची बादली का भरून ठेवतात? 99 टक्के लोकांना माहीत नसतं खरं कारण
  • शिवा मुझे अपने साथ ले चलो..; 30 वर्षीय अभिनेत्रीच्या निधनानंतर शेवटची पोस्ट चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in