• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोर्टाचा दणका! निकालावर खासदार ओमराजे निंबाळकर यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट..

June 20, 2026 by admin Leave a Comment


खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये आज निकाल आला. कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींनी निर्दाेष मुक्तता देण्यात आली. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. तब्बल 20 वर्षांनी हा निकाल देण्यात आला. खासदार ओमराजे निंबाळकर यांना या निकालानंतर मोठा धक्का बसला आहे. या निकालावर ओमराजे निंबाळकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, हा निकाल दुर्देवी आहे. कारण मागच्या 20 वर्षापासून अखंडपणे आरोपींना शासन व्हावे, शिक्षा व्हावी याकरिता प्रयत्न करत होतो. तपास यंत्रणांसोबतच आम्ही प्रयत्न करत होतो. दुर्देवाने जो निकाल आहे, त्या निकालाला आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. उच्च न्यायालयाकडून आता न्यायाची अपेक्षा आहे.

कोर्टाने जो निकाल दिला आहे, त्याच्यावर आता बोलण्यापेक्षा उच्च न्यायालयात अपील करणे आणि उच्च न्यायालयाला पटवून देणे महत्वाचे आहे. कोर्टाचा निकाल आहे आणि तो प्रत्येकाला स्वीकारावाच लागतो. हा पण त्याबाबत आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत. शेवटपर्यंत याकरिता आम्ही संघर्ष करणार आहोत. हा निकाल धक्कादायक असल्याचेही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.

पुढे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, कोर्टात जे पुरावे आहेत, ते पुढे येणार आहेत. या प्रकरणाचा पहिल्यांदा तपास मुंबई पोलिस करत होते आणि मुंबई पोलिसांवर प्रचंड दबाव होता. त्यानंतर हा तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यांच्यावरही प्रचंड दबाव होता. म्हणून आम्ही 2008 मध्ये उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही केस सीबीआयकडे गेली.

त्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला. त्यामुळे सुरूवातीच्या तपास यंत्रणांवर दबाव होता. त्यामुळे सीबीआयकडे तपास द्यावा, याकरिता आम्ही अपील केले होते. याबाबत आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू. हे कलियुग आहे मी इतकेच म्हणेल की वाईटाला जास्त बळ असते चांगल्याला लवकर बळ मिळत नाही. यावेळी राजकीय भविष्यावरही बोलताना ओमराजे निंबाळकर दिसले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या लेकीची पहिली मंगळागौर थाटात; नऊवारीतील ज्ञानेश्वरीच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
  • भेंडीची भाजी खाण्यापूर्वी ‘या’ 5 गोष्टींचा नक्की करा विचार, तुमच्यासाठी ठरु शकते घातक!
  • पाकिस्तान क्रिकेटची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की; इंग्लंडच्या दिग्गजाने जाहीरपणे उडवली खिल्ली!
  • सुभाष चंद्रा यांच्या कर्जमाफीला LIC, युनियन बँकेचा थेट विरोध, NCLAT मध्ये अपील करण्याचा निर्णय! 
  • काळ्या ड्रेसमध्ये काजोलच्या हटके अदा, फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हणते…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in