• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोणत्या देशाकडे किती आहेत विमानवाहू नौका, समुद्रात कोणाची ताकद किती ?

September 8, 2026 by admin Leave a Comment


समुद्रात कोणत्या देशाची सैन्य ताकद किती आहे हे दाखवणाऱ्या सर्वात मोठ्या हत्यारांपैकी विमानवाहू नौकाचा ( Aircraft Carrier) समावेश आहे. विमानवाहू नौका समुद्रात तरंगत्या एअरबेस प्रमाणे काम करत असते. या विमानवाहू युद्धनौकावरुन लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर उडवता येते. सध्या विमानवाहू युद्धनौकाच्या बाबतीत अमेरिका इतर देशांहून खूपच पुढे आहे. चीन वेगाने आता विमानवाहू नौका ( Carrier Fleet ) वाढवत आहे. भारतही हिंद महासागरात आपली उपस्थिती दाखवत आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये अमेरिकन Aircraft Carrier USS Abraham Lincoln दीर्घ तैनाती देखील चर्चेत आहे. ही विमानवाहू नौका अलिकडेच थायलंडहून पटायाला पोहचली होती. आणि याच्या आधी अनेक दिवस समुद्रात तैनात होती.

अमेरिकेकडे सर्वाधिक 11 Aircraft Carrier

Aircraft Carrier च्या बाबतीत अमेरिका सर्वात पुढे आहे. अमेरिकी नौदलाजवळ 11 मोठ्या अणू ऊर्जेवरुन धावणाऱ्या Aircraft Carrier आहेत. यात नव्या Nimitz Class आणि नवीन Gerald R. Ford Class च्या Carrier नौकाचा समावेश आहे. या विमानवाहूनौकांवरुन मोठ्या प्रमाणावर लढाऊ विमाने ऑपरेट करता येऊ शकतात. दीर्घकाळ समुद्रात राहून दुसऱ्या देशांच्या विरोधात मोहिम सुरु करण्याचा क्षमता त्यांच्याकडे आहे. या कारणामुळे कॅरिअरच्या संख्ये सोबतच त्यांचे तंत्रज्ञान, विमान, आणि जगातील विविध देशातील त्यांची तैनाती अमेरिकेला या क्षेत्रात जगापेक्षा सर्वात मजबूत बनवते.

चीनकडे 3 Aircraft Carrier, Fujian

चीनकडे तीन एअरक्राफ्ट कॅरियर आहेत. चीनकडे 3 Aircraft Carrier असून त्यात Liaoning, Shandong आणि Fujian यांचा समावेश आहे. यात Fujian सर्वात नवीन असून तिला नोव्हेंबर 2025 मध्ये समाविष्ठ करण्यात आले.

Fujian मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक विमान लॉन्च सिस्टीम लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे तिची विमान लाँच करण्याची क्षमता जुन्या चीनी विमानवाहू नौकाहून अधिक आहे.2026 मध्ये चीनच्या हिच्या ऑपरेशनल वापराच्या दिशेने पावले उचलली. त्यामुळे चीन समुद्रात आपली ताकद वाढवण्याचा वेगाने प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते.

भारताकडे 2 Aircraft Carrier

सध्या भारताकडे INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत अशा दोन विमानवाहू युद्धनौका आहे. आयएनएस विक्रांत भारतात तयार झालेली पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आहे. दोन्ही युद्धनौका भारतीय नौदलासाठी खूपच महत्वपूर्ण आहेत. आणि यातून हिंद महासागर क्षेत्रात भारताची समुद्री ताकद वाढली आहे. INS विक्रमादित्य रशियाने दिलेली युद्धनौका असून दोन्ही विमानवाहू युद्धनौका भारतासाठी महत्वाच्या आहेत. चीनची वाढलेली ताकद पाहून भारतही तिसरी विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची शक्यता आहे.

ब्रिटन, इटली आणि जापान देखील मजबूत

Aircraft Carrier च्या संख्येत अमेरिका, चीन आणि भारत यांच्या नंतर दुसरेही काही देश आहेत. ब्रिटनजवळ २ क्वीन एलिझाबेथ क्लास एअरक्राफ्ट कॅरीयर आहे. इटलीच्या जवळ देखील दोन मोठ्या कॅरीयर आहेत. तर जपानच्या जवळ देखील अशा Aircraft Carrier विमानवाहू युद्ध नौका आहेत. ज्यांच्यावरुन
F-35B शॉर्ट टेकऑफ आणि व्हर्टिकल लँडिंग वाले विमान ऑपरेट केले जाऊ शकतात. फ्रान्सजवळ देखील एक अणू ऊर्जेवरील चालणारी विमानवाहू युद्धनौका आहे. मात्र सर्व देशांच्या कॅरियरचा आकार, विमान क्षमता आणि वापराचा प्रकार वेगवेगळा आहे. त्यामुळे केवळ संख्या पाहून त्यांच्या ताकदीची तुलना होऊ शकत नाही.

समुद्रात सर्वात शक्तिशाली कोण आहे?

विमानवाहू जहाजांची संख्या, त्यांचा आकार, अणुशक्ती, लढाऊ विमानांची क्षमता आणि जागतिक तैनाती या सर्वांचा एकत्रित विचार केल्यास, अमेरिका ही सर्वात शक्तिशाली विमानवाहू नौकांची शक्ती आहे. चीन वेगाने प्रगती करत असून, ‘फुजियान’ विमानवाहू नौका हे तिच्या वाढत्या क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. भारताची ताकद प्रामुख्याने हिंद महासागर क्षेत्रात असून, त्यांच्याकडे दोन कार्यरत विमानवाहू जहाजे आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 9 वा राष्ट्रीय पोषण माह 9 सप्टेंबरपासून सुरू, ‘हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी’ मुख्य थीम
  • भारताची रिफॉर्म एक्सप्रेस आणखी वेगाने धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
  • तिकडे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी, इतके पक्षांतर बंदी कायद्यातच बदल? राहुल नार्वेकरांकडे मोठी जबाबदारी
  • अभिजीत दिपकेंना मोठा धक्का, भाजप नेत्यानं कोर्टात खेचलं; सीजेपीपुढं नवं संकट
  • राज्यात मोठं काही घडणार? ऑपरेशन टायगर होणार का? उदय सामंत पहिल्यांदाच म्हणाले, लवकरच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in