• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोणत्या गंभीर आजाराशी झुंजत होती शमिता शेट्टी ? अनेक महिने निदानच होत नव्हते, अखेर व्यक्त केल्या भावना..

July 11, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खान हिचा शो ‘ऑल अबाऊट हर’मध्ये बॉलीवूड अभिनेत्री शमिता शेट्टी ही तिला झालेल्या आजाराबद्दल व्यक्त झाली आहे. हा १० जुलै रोजी हा एपिसोड प्रक्षेपित होणार आहे. तिने सांगितले की या गंभीर आजाराबद्दल बोलताना शमिता अतिशय व्यतिथ झाली होती. या गंभीर आजाराबद्दल नेहमची चुकीचे निदान होते. आणि लाखो महिलांना कसे गपचूप आपल्या वेदनांशी झुंज देत असतात असे सांगितले.

शमिता शेट्टी हीला एंडोमेट्रियोसिस ( Endometriosis ) नावाचा आजार झाला आहे. या आजाराचे निदान करण्याचा प्रवास आणि स्वत:वर संशय आणि वैद्यकीय निदानातील चूक या अवघड परिस्थितीतून ती गेली आहे. जेव्हा सोहा अली खान हीने तिला विचारले की आजाराचे खरे कारण कळण्याआधी किती काळापासून वेदना होत होत्या ? त्यावर शमिता हीने सांगितले की वैद्यकीय चाचणीनंतरही खऱ्या समस्येचा थांगपत्ता लागला नव्हता. परंतू वेदना असह्य होत राहिल्या, मला वाटत होते की हे सर्वसामान्य आहे.

स्वत:च्या आरोग्याबद्दल काय म्हणाली शमिता

मी अनेक वर्षे अंगावरच दुखणे काढले, मला सुरुवातीला आजाराचा योग्य पत्ता लागला नव्हता. जेव्हा मला काही लक्षणे जाणवू लागली. तेव्हा मला वाटले की सामान्य दुखणे असावे. परंतू मी जेव्हा पहिल्यांदा गायनाकॉलॉजिस्टजवळ या संदर्भात या तक्रारी घेऊन गेली. तेव्हा त्यांनी सर्व रुटीन टेस्ट, पॅप स्मीयर आणि इतर सर्व चाचण्या करुन पाहिल्या. जेव्हा सर्व रिपोर्ट नॉर्मल आले, तेव्हा पुढे काही चाचणी करण्याचा विचार कोणीच केला नाही. तेव्हाच तपासणी संपली.

 

आजाराचे निदान लागण्यातील अडचण यासाठी वाढली, कारण माझ्यातील गंभीर लक्षणाची सुरुवात एका आणखी मोठ्या हार्मोनल बदलाच्या वेळी झाली होती. शमिता हीने मान्य केले की ती खूपच कोड्यात सापडली होती. कारण हे सर्व त्याच काळात होत होते, जेव्हा माझ्या पेरिमोनोपॉड ( मोनोपॉझच्या आधीचा काळ ) संदर्भात मी जाणून घेत होते. ती पुढे म्हणाली की माझ्या हार्मोनच्या आधी खूप काही होत होते. यामुळे समजत नव्हते की जे मला जाणवत होते, ते पेरिमोनोपॉजचाच भाग आहे की आणखी काही गडबड आहे.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kuku Kohli Funeral: पतीला अखेरचा निरोप देताना अरुणा ईराणींचा बांध फुटला; कुकू कोहलींच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडची गर्दी
  • लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच… अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
  • गरज असेल तरच घराबाहेर पडा… महाराष्ट्रासह 26 राज्याला 13 तास संकटाचे; IMDची मोठी अपडेट काय?
  • तुमची किंमत ओळखा आणि…, फोटो पोस्ट करत काजोलने चाहत्यांना दिला महत्त्वाचा सल्ला
  • Jasprit Bumrah: बुमराहला मिळाली सर्वात मोठी वाईट बातमी, दोन वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की…दबदबाच कमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in