• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा आक्रमक; दिल्लीत शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरले, नेमकं काय घडलं?

September 4, 2026 by admin Leave a Comment


काँक्रोच जनता पार्टीने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करावी, यासाठी संसद मार्ग पोलीस स्टेशनजवळ शेकडोच्या संख्येने धडकले आहेत. जंतरमंतरवर निशू आझादचे वडील संजय कुमार यांना स्वतंत्र भारद्वाजने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतरही त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर दिल्ली पोलिसांनी कारवाई करावी, यासाठी सौरव दास, आशुतोष रांका हे कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकासह संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत खासदार चंद्रशेखर देखील आहेत.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पॉडकास्टमध्ये स्वतंत्र भारद्वाजने संजय कुमार यांच्या डोक्यावर मारहाण केल्याचा दावा केला. राजकीय दबावामुळे माझ्यावर कारवाई झाली नसल्याचा दावा त्याने केला. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सीजीपीचे सौरव दास, आशुतोष रांका यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर शेकडोच्या संख्येने कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक संसद मार्ग पोलीस स्टेशनला पोहोचले. संजय कुमार यांची मुलगी निशू आझाद देखील पोलीस स्टेशनला पोहोचली.

आशुतोष रांका यांनी सांगितलं की, ‘जंतर-मंतरवर आंदोलनावेळी सीजेपीच्या समर्थकाच्या वडिलांना मारहाण झाली होती. या मारहाणीत डोक्याला जखम झाली होती. यामुळे सौरव दास आणि सीजेपी समर्थकांनी भारद्वाजवर कारवाईची मागणी केली. त्यानंतरही त्याच्या विरोधात कारवाई झाली नाही. त्याच्यावर कारवाईची मागणी केल्यानंतरही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही’.

आशुतोष रांका यांनी पुढे म्हटलं की, भारद्वाज हा उघडपणे संजय कुमार यांच्यावर हल्ला केल्याचे सांगत आहे. कपिल मिश्रा आणि भाजप कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. देश आणि लोकशाहीसाठी काळिमा फासणारी घटना आहे. आमची संपूर्ण टीम सुरुवातीपासून संजय कुमार यांच्यासोबत आहे. आता आमची मागणी आहे की, दिल्ली पोलिसांनी त्याला तातडीने अटक करावी. त्याच्याविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. तसेच इतर गंभीर गुन्हे दाखल करावेत. कॉक्रोच जनता पार्टीसहित काँग्रेसची लीगल टीम देखील निशू आझादच्या मदतीसाठी सक्रिय झाली आहे. राहुल गांधी यांनी एक पोस्ट केल्यानंतर काँग्रेसची लीगल टीम मदतीसाठी पुढे आली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • राज्यात मतदारयादीचा मुद्दा पेटला; 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, काय संदेश दिला?
  • Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
  • Ashwini Paul: स्वत: राष्ट्रीय कुस्तीपट्टू, वडिल शिक्षक पण नवरा मात्र… अश्विनी पौळ प्रकरणात नवी माहिती समोर
  • Jasprit Bumrah: बुमराह जर फिट झाला नाही तर… बीसीसीआयकडे रिप्लेसमेंट तयारच, नाव आलं समोर
  • अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपटाचा 19 वर्षांनी येणार सिक्वेल, शूटिंग चक्क..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in