• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपटाचा 19 वर्षांनी येणार सिक्वेल, शूटिंग चक्क..

September 4, 2026 by admin Leave a Comment


Hey Baby 2 : १९ वर्षांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आलेला ‘हे बेबी’ चित्रपट आयकॉनिक आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता. या चित्रपटाची कहाणी, स्टारकास्ट आणइ कॉमेडी टायमिंग, सगळंच जुळून आलं आणि समोर आला एक भन्नाट चित्रपट. या चित्रपटाच्या सीक्वेलबाबात बऱ्यचा काळापासून चर्चा सुरू होती. फायनली, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा आता झाली आहे. हो, हे खरं आहे, ‘हे बेबी 2’ ची अधिकृत घोषणा झाली आहे. तसेच चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनबद्दलही माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचं बरचसं शूटिंग हे ऑस्ट्रेलियात होणार आहे. साजिद नाडियाडवालाच्या नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसने ऑस्ट्रेलियात आपल्या आगामी तीन चित्रपटांच्या शूटिंगसाठी एक डील साईन केली आहे. त्यामध्ये २००७ साली आलेल्या ‘हे बेबी’ या चित्रपटाच्या सीक्वेलचाही समावेश आहे.

‘हे बेबी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन साजिद खान याने केलं होतं. या चित्रपटात अक्षय कुमार, फरदीन खान, रितेश देशमुख, विद्या बालन आणि बोमन इराणी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तसेच अनेक कलाकारही या चित्रपटात झळकले. आता याा पिक्चरचा सीक्वेल घोषित झाला आहे. यावेळी नवं काय पहायला मिळणार आणि कोणाची भूमिका असणार ? चला जाणून घेऊया..

ऑस्ट्रेलियामध्ये होणार ‘हे बेबी 2’ चं शूटिंग

‘हे बेबी 2 ‘ या चित्रपटाचं ऑस्ट्रेलियाशी खास कनेक्शन आहे, कारण ‘हे बेबी’ (Heyy Babyy) या पहिल्या चित्रटाचं शूटिंगही याच देशात झालं होतं. मात्र आा, जवळपास २ दशकांनंतर , या चित्रपटाचा पुढील भाग (सिक्वेल) त्याच देशात परत येत आहे. त्यामुळे मोठी उत्सुकता आहे. ‘हे बेबी 2’चं कथानक आणि त्यातील कलाकार यांच्याबद्दलची माहि, हे काही अजून जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र असं असलं तरीही या सिक्वेलच्या घोषणेमुळे चाहत्यांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

न्यू साउथ वेल्सचे (NSW) प्रमुख क्रिस मिन्स 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत भारताच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मुंबईतील ‘नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट’च्या कार्यालयाला भेट दिली. तिथे त्यांनी परिसराची पाहणी केली आणि संबंधित प्रॉडक्शन हाऊसच्या टीमशी संवाद देखील साधला. याच भेटीदरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये तीन चित्रपटांच्या चित्रीकरणाबाबतच्या एका कराराची घोषणा केल्याची माहिती समोर आली आहे.

19 वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर आला होता ‘हे बेबी’

2007 साली हे बेबी हा चित्रपट रिलीज झाल होता. या पिक्चरमध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख और फरदीन खान हे तिघे तर दिसले. पण अभिनेत्री विद्या बालन हिचीही विशेष भूमिका होती. या चित्रपटाचं कथानक एका छोट्या बाळाभोवती फिरतं, हे तिघे मिळून त्या लहान बाळाचा सांभाळ करत असतात. तर विद्या बालन लीड रोलमध्ये होती. हा चित्रपट चांगलाच हिट ठरला आणि बॉक्स ऑफीसवर देखील उत्तम कामगिरी केली होती. त्यामुळेच ‘हे बेबी 2’ साठी देखील चाहते तितकेच उत्सुक आहेत. तो कधी प्रदर्शित होणार याची माहिती अद्यप जाहीर झालेली नाही.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिजीत दिपकेंची CJP या पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार? थेट पक्षाध्यक्षांसोबत महत्त्वाची बैठक, घडामोडींना वेग
  • NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
  • जात पडताळणी समितीवर कोणीही…! 4 नगरसेवकांचं पद रद्द झाल्याचा दाखला देत भुजबळ बरसले
  • नीम करोली की नीब करोरी? दोन नावाचं काय रहस्य? कोणते नाव योग्य? कोणत्या राज्यात बाबाचं घर, तुम्हाला माहिती आहे का?
  • Arhaan Debut Film : सलमानचा पुतण्या बॉलिवूड एंट्रीसाठी सज्ज; भाईजानही करणार कॅमिओ ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in