• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कॉक्रोच जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनाचा बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींना मोठा फटका, नेमकं घडतंय तरी काय?

July 24, 2026 by admin Leave a Comment


कॉक्रोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि शिक्षण व्यवस्थेत योग्य ते बदल करण्याची मागणी करत आज देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. ज्याचा मोठा फटका बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शकांना बसला आहे. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी बहुप्रतिक्षीत ‘रामयण’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला, तेव्हाच अशी घोषणा करण्यात आलेली की, 24 जुलै रोजी सिनेमाचा ट्रेलर जगभरात प्रदर्शित करण्यात येईल. पण निर्मात्यांनी ट्रेलर आज प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी आता ‘सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट’च्या पार्टनरशीमध्ये हा सिनेमा नंतरच्या तारखेला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘रामायण’ सिनेमाचा ट्रेलर आज नाही होणार प्रदर्शित…

निर्माते नमित मल्होत्रा यांनी इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर करत मोठी घोषणा केली आहे. ‘आज आपल्या ‘रामायण’ सिनेमासाठी प्रचंड खास दिवस आहे. ‘सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट’सोबत आमच्या पर्टनरशीपच्या माध्यमातून ‘रामायण’ संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याचं माझं स्वप्न पूर्ण होणार आहे… ही गोष्ट लक्षात घेत, आता आपण ट्रेलर पुढच्या तारखेला प्रदर्शित करणार आहेत..’, असं निर्माते म्हणाले. पण तारीख अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namit Malhotra (@iamnamitmalhotra)

‘रामायन’ सिनेमाचं ट्रेलर का रद्द करण्यात आलं?

नमिक मल्होत्रा यांनी थेट सांगितलं नाही की, सिनेमाचं ट्रेलर नक्की का टाळण्यात आला. मात्र, देशभरात CJP च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. या विधानाच्या वेळेबाबत सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्क लढवले जात असून, सद्यस्थिती लक्षात घेऊनच निर्मात्यांनी ऑनलाइन लाँच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे.

सीजेपीकडून देशव्यापी आंदोलनाची हाक…

कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी जंतरमंतर ते संसदेपर्यंत मोर्चा पुकारलेला आणि मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी दिल्लीत पोहोचले. आता सीजेपीकडून 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनासाठी देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहतील असं देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान, आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एवढंच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील विद्यार्थ्यांचं समर्थन केलं आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्रातल्या या गावात फक्त 6-7 तासांचाच दिवस, तुम्हाला माहित्ये का नाव ?
  • तिच्या नशिबात मृत्यूच नव्हता, नवविहातीने 10 व्या मजल्यावरून उडी मारली पण.., वाचा काय घडलं?
  • Kriti Sanon : हिंदूची आणखी किती परीक्षा घेणार…, ‘राखी’च्या जाहिरातीत कृतीचा ब्रालेट लूक, सोनू निगम काय म्हणाला?
  • स्वयंपाकघरात ‘या’ 4 वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने वाढू शकतात अडचणी, जाणून घ्या वास्तू नियम
  • सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्राचा दावा, वातावरण तापलं, वडेट्टीवारांनी कोणाची सुपारी घेतली? शशिकांत शिंदेंचा सवाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in