• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केवळ १०० रुपयांच्या रोजच्या बचतीने बना लखपती, पोस्ट ऑफीसची ही योजना भन्नाट

July 26, 2026 by admin Leave a Comment


 

 

Gram Suraksha Yojana: जर तुम्ही तुमच्या कमाईतून थोडासा भाग भविष्यासाठी बचत करु इच्छीत असाल तर पोस्टाची सरकारी योजना तुमच्या फायद्याची आहे. पोस्ट ऑफीसच्या या सरकारी योजनेत तुमच्या पैशांची गॅरंटी सरकार घेत असते. अनेकदा लोक शेअर बाजारातील योजनात पैसे गुंतवण्यास कचरत असतात. यामुळे पोस्ट खात्याची ही योजना तुमच्यासाठी विश्वासार्ह ठरु शकते.

 

पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana) एक अशीच योजना आहे. या योजनेत जीवन विमा सुरक्षा आणि बोनसचा लाभ मिळतो. ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI)अंतर्गत चालणाऱ्या या योजनेत दीर्घकाळापर्यंत छोटी-छोटी रक्कम जमा केल्याने तुम्हाला एक मोठा फंड तयार करता येऊ शकतो.

ग्राम सुरक्षा योजनेचे फायदे?

सरकारी योजना असल्याने सुरक्षित पर्याय मानला जातो.

विमा सुरक्षेसोबत बचतीचा फायदा मिळतो.

कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते.

दीर्घकाळात मोठा फंड तयार करण्याची संधी मिळते.

प्रीमीयम जमा करण्यासाठी मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक हप्त्याचे पर्याय आहेत.

रोज १०० रुपये वाचवून कसा मोठा फंड होईल ?

जर तुम्ही रोजच्या खर्चातून १०० रुपये बाजूला काढले. तर महिन्याला ३००० रुपये आणि वर्षाला सुमारे ३६,५०० रुपये जमा करु शकता. म्हणजे जर तुम्ही १९ व्या वर्षी या योजनेत सामील झाला तर ६० व्या वर्षापर्यंत प्रीमियम जमा करु शकता. अशात सुमारे ४१ वर्षे गुंतवणूक केल्यानंतर तुमची एकूण जमा रक्कम सुमारे १४.९६ लाख रुपयांपर्यंत पोहचू शकते.

मात्र, मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम केवळ तुम्ही जमा केलेल्या पैशांवर अवलंबून नसते. तर निवडलेली विमा रक्कम आणि सरकारने घोषीत केलेला बोनस देखील यात महत्वाची भूमिका बजावतात.

कसा बनतो ३० लाखांहून अधिक फंड?

जर तुम्ही १० लाख रुपयांचा सम एश्योर्ड घेत असाल तर त्यावर तुम्हाला ६० रुपये प्रति १,००० रुपये सम एश्योर्डच्या हिशेबाने वार्षिक बोनस मिळतो. त्याचे अंदाजित कॅलक्युलेशन खालील प्रमाणे होऊ शकते.

विमा रक्कम : १० लाख रुपये

वार्षिक बोनस: सुमारे ६०,००० रुपये

४१ वर्षांचा बोनस: सुमारे २४.६० लाख रुपये

एकूण मॅच्युरिटी रक्कम : सुमारे ३४.६० लाख रुपये

म्हणजे दीर्घकाळात ही रक्कम सुमारे ३५ लाख रुपयांपर्यंत पोहचू शकते. परंतू ही अंतिम रक्कम तुमचे वय, प्रीमियम, निवडलेली विमा रक्कम आणि सरकारद्वारा घोषीत बोनस दरावर अवलंबून असते. अशात हे आवश्यक आहे की गुंतवणूक करताना तुम्ही पोस्ट ऑफीसमधून याची सर्व माहिती मिळवू शकता.

अर्ज कसा करायचा ?

जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची आहे तर जवळील पोस्ट ऑफीसमध्ये जाऊन अर्ज करु शकता. यासाठी तुम्हाला आधारकार्ड, पॅनकार्ड, ओळखपत्र, पत्त्याच्या पुरावा, वयाचा दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो सारखी कागदपत्रांची गरज लागू शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’
  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?
  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
  • Tukaram Mundhe: मुंढे इफेक्ट, दादरच्या प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याचे धाबे दणाणले, लगेच केला बदल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in