
केतन अगरवाल हत्या प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहेत. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्याही पोलीस कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज न्यायालयात सरकारी पक्षाने सिया आणि चेतनचा आणखी तपास करायचा आहे. चेतनचे रिक्रियेशन करायचं आहे, पॅन्ट रिकव्हर करायची आहे, असे सांगितले.
तसेच, या हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का? हत्येचा सराव कुठं केला? असा बराच तपास करायचं असल्याची भूमिका सरकारी वकिलांनी न्यायालयापुढे मांडली. तर दुसरीकडे सात दिवसांच्या तपासात ही सर्व प्रक्रिया का केलं नाही? असा प्रतिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.
यासह केतन अगरवाल यांचा मृत्यू दरीत पडून झाला आहे. पण केतनची हत्या झाली असं म्हटलं जातंय. आई-वडील म्हणतायेत म्हणून याला हत्या म्हणता येणार नाही, असा महत्त्वाचा युक्तिवादही आरोपींच्या वकिलाने केला आहे.
म्हणजेच केतनची हत्या झालीच नाही. त्याचा दरीत पडून मृत्यू झाला आहे, असं आरोपीचं मत आहे. दरम्यान, आता दोन्ही आरोपींना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यामुळे आता या प्रकरणात नेमकी कोणती माहिती समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




Leave a Reply