• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

June 29, 2026 by admin Leave a Comment


पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या गाजलेल्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी 26 जून रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते. या निकालानंतर राज्यभरातून समाधान व्यक्त केले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या निर्णयाचे स्वागत केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यात आला. पोलिसांनी अल्पावधीत महत्त्वाचे पुरावे गोळा केले आणि न्यायालयाने सलग सुनावणी घेत जलदगतीने निकाल दिला. त्यामुळे पीडित कुटुंबाला वेळेत न्याय मिळाला, असे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेची माहिती देताना सांगितले की, 16 मे 2026 रोजी या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि अल्पावधीत साक्षी नोंदवण्यास सुरुवात झाली. केवळ काही दिवसांत 55 साक्षीदारांची तपासणी आणि उलटतपासणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर 26 जून रोजी आरोपीला दोषी ठरवण्यात आले आणि 29 जून रोजी न्यायालयाने त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात न्यायालयाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष न्यायमूर्ती एस. आर. साळुंखे यांचे आभार मानले. सलग सुनावणी घेण्यासाठी त्यांनी स्वतःच्या सुट्ट्याही रद्द केल्या, असे सांगत त्यांनी न्यायव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.

तसेच, या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणारे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गील आणि त्यांच्या पथकाचेही मुख्यमंत्री यांनी अभिनंदन केले. “अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वेळेत आणि कठोर शिक्षा झाली तर समाजात कायद्याचा धाक निर्माण होतो. या प्रकरणात पोलीस आणि न्यायालयाने एक आदर्श निर्माण केला आहे,” असे म्हणत त्यांनी तपास यंत्रणा आणि न्यायसंस्थेचे आभार व्यक्त केले.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in