• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चेतनच्या पँटमध्ये दडलंय केतनच्या खुनाचं गूढ? सियाने हत्येचा कट…पोलिसांना तो पुरावा सापडणार का?

June 29, 2026 by admin Leave a Comment


Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील कोट्यधीश कुटुंबातील केतन अग्रवाल हत्याकांडात रोज खळबळजनक खुलासे होते आहेत. या प्रकरणाच्या मुळात जाण्यासाठी पोलिसांकडून आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंतच्या चौकशीत दोघांनीही केतनला मारण्यासाठी कट रचला होता, असे प्रथमदर्शन स्पष्ट होते, असे म्हटले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली. तर पोलीस कोठडी देऊ नये, अशी मागणी करत आरोपी चेतन चौधरीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. या युक्तिवादात चेतनच्या वकिलांनी खळबळजनक दावे केले आहेत. या कटात चेतन सहभागी नव्हताच, असा दावा त्यांनी केला.

न्यायालयात नेमकं काय घडलं?

अॅड. राम सहाणे यांनी आरोपी चेतन चौधरीची बाजू मांडली. युक्तिवादादरम्यान एफआयआरमध्ये चेतनचे फक्त दोन वेळा नाव आलेले आहे. सिया सारखं चेतनचं नाव घेते. घटनास्थळाचा पंचनामा, सामानाची जप्ती, समोर बसून चौकशी करणे यासाठी 7 दिवस पोलीस कोठडी आधीच दिलेली आहे. लोहगडावर आधी सियाचं नाट्यरूपांतर केलं आणि चेतनचे नाट्य रूपांतर करायचं असं सांगितलं जातंय. चेतनची पॅन्ट जप्त करायची आहे? हुडी, मोबाईल, गाडी जप्त केलेली आहे. तेव्हाच पॅन्ट जप्त का केली नाही? असा सवाल चेतनच्या वकिलांनी उपस्थित केला.

चेतनच्या कस्टडीचा काय संबंध?

मोबाईल फोन सियाकडे होता. मग यासाठी चेतनच्या कस्टडीचा काय संबंध? आरोपींनी हत्या करण्याचा सराव केला होता? ते घटनास्थळी जाऊन पाहायचं आहे, असं सांगितलं जातंय. मग सात दिवसांत का गेला नाही? काहीतरी दाखवायचं म्हणून दोन कारणं दिली जात आहेत. कस्टडी वाढवून मागितली जात आहे, असेही आरोपी चेतनचे वकील यावेळी म्हणाले.

पॅन्ट मागितली असती तर ती पण दिली असती

प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही गाडी स्वतः आणून दिली. पॅन्ट मागितली असती तर ती पण आणून दिली असती.
आम्हाला तर सर्व मिडियाकडून कळतंय, असे म्हणत चेतनला आता पोलीस कोठडी देऊ नये, अशी मागणी चेतनच्या वकिलाने न्यायालयाकडे केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in