• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केएल राहुल याने या IPL टीमच्या मालकावर काढली भडास, मानसिकदृष्ट्या खचल्याचा केला खुलासा..

August 4, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटर केएल राहुल याने आयपीएल 2024  मध्ये लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात लखनौचा 10 गडी राखून दारुण पराभव झाला. हैदराबादने 166 धावांचे लक्ष्य फक्त 9.4 षटकांत पूर्ण केले. या पराभवानंतर भर मैदानात जो राडा झाला त्यानंतर प्रत्येकजण हैराण होता. लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी थेट मैदानावरच कर्णधार केएल राहुल याच्यावर भडकले. केएल राहुलसोबत त्यांची रागाच्या भरात झालेली वादावादी चर्चेचा विषय ठरली होती. रागाच्या भरात त्यांनी जे काही हातवारे केले त्यानंतर सर्वांनी संताप व्यक्त केला. केएल राहुल फक्त खाली मान घालून सर्वकाही ऐकून घेत होता. केएल राहुल याच्या चाहत्यांचा मोठा भडका उडाला होता. देशभरातून संताप व्यक्त होता होता. कारण शेवटी केएल राहुल हा एक भारतीय क्रिकेटर आहे, त्याला भर मैदानात अशी वागणूक देणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले.

यादरम्यानच आता या सर्वांवर केएल राहुल याने पहिल्यांदाच तोंड उघडले. त्यावेळी नक्की काय घडले हे सांगताना केएल राहुल दिसत आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना केएल राहुल दिसला. ज्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. मात्र, यादरम्यान केएल राहुल याने संजीव गोयंका यांचे नाव घेणे टाळले. पण तो काही गोष्टी स्पष्ट बोलताना दिसला.  केएल राहुल याने म्हटले की, एक कर्णधार म्हणून अनेक बैठका यासोबतच आढावा सत्रे. त्यानंतर संघाच्या मालकांना स्पष्टीकरणे देणे हे सर्व माझ्यासाठी आव्हानात्मक होते.

🚨 KL Rahul: “Sanjiv Goenka’s constant questions mentally drained me.”🚨

KL Rahul: What I found hardest as an IPL captain was the sheer number of meetings, reviews, and explanations required at the ownership level. It was mentally exhausting. By the end of an IPL season, I felt… pic.twitter.com/XPMQ6IoTOV

— Mahi Patel (@Mahi_Patel_07) August 3, 2026

यामुळे मी मानसिकदृष्ट्या खूप जास्त थकलो होतो. सलग दहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर होणाऱ्या थकव्यापेक्षाही कुठे ना कुठे मानसिक आणि शारीरिक थकवा मला अधिक जाणवला. हे निर्णय का घेतले त्या खेळाडूची निवड का केली… संघाने खराब कामगिरी का केली, अशा अनेक प्रश्नांना सतत तुम्हाला सामोरे जावे लागते. आंतरिक राष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रशिक्षकांकडे आणि निवड समितीकडे उत्तर काही गोष्टींचे द्यावे लागते.

Don’t be harsh on Sanjiv Goenka.
He was just having normal motivating conversation with KL Rahul.

The real audio of the conversation is here.
Please listen to it carefully🙏🏻 pic.twitter.com/CCWGK1QWkk

— Bruce (@_Bruce__007) May 9, 2024

पण त्यांना खेळातील बारकावे समजतात. तुम्ही काहीही केले किंवा सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता केली, तरीही या खेळात विजयाची कोणतीही गॅरंटीच मुळात नसते. ज्यांचा खेळाशीच काहीही संबंध नाही ते लोक काही कालावधीत निश्चित निकालाची अपेक्षा तुमच्याकडून करतात. अशा लोकांना समजून सांगणे फार जास्त अवघड काम असते.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!
  • Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’
  • 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
  • Mumbai : सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप
  • तुकाराम मुंढेप्रमाणे कारखान्यांच्या गोडाऊनवर धाडी घाला! साखर महागताच कुणी केली मागणी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in