• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केंद्रीय मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, मोठं कारण आलं समोर

July 24, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय त्यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. हा निर्णय भारतीय संविधानाच्या कलम 75(2) अंतर्गत घेण्यात आला आहे.

राजीनाम्याचे कारण आले समोर

राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, रवनीत सिंह बिट्टू यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे रवनीत सिंह बिट्टू यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 21 जून रोजीच संपला होता. 18 जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे ते सध्या राज्यसभा किंवा लोकसभेचे सदस्य नाहीत. मात्र त्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्यात आला नव्हता. मात्र, आज त्यांचा राजीनामा अधिकृतपणे मंजूर करण्यात आला आहे.

कोण आहेत रवनीत सिंह बिट्टू?

रवनीत सिंह बिट्टू यांनी 24 मार्च 2024 रोजी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला होता. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते. 11 मार्च 2021 ते 18 जुलै 2021 या कालावधीत त्यांनी लोकसभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते 2009 मध्ये आनंदपूर साहिब, तर 2014 आणि 2019 मध्ये लुधियाना मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आले होते. ते पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांची रेल्वे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सिंघू सीमेवर झाला होता हल्ला

जानेवारी 2021 मध्ये ‘जन संसद’ कार्यक्रमादरम्यान सिंघू सीमेवर रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर हल्ला झाला होता. यानंतर त्यांची लोकसभेत काँग्रेस पक्षाचे व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच, मार्च 2021 मध्ये, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले काँग्रेसचे तत्कालीन लोकसभा नेते अधीर रंजन चौधरी यांच्या अनुपस्थितीत बिट्टू यांनी काही काळ लोकसभेतील काँग्रेस पक्षनेते म्हणूनही काम केले होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in