• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक

July 20, 2026 by admin Leave a Comment


राजधानी दिल्लीत आज कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलक आणि पोलिस आमनेसामने आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संसद भवनाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते. मात्र, आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी आश्रुधुराचा वापर केला. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्जही करण्यात आला.

दुसरीकडे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 3 तास चर्चा झाली. या भेटीत किरण रिजिजूदेखील उपस्थि होते. सूत्रांच्या माहितीनुसार, आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा आणि पुढील पावले यावर या बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान, या घडामोडी सुरू असतानाच कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत पक्षाने सरकारसमोर 3 प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये सोनम वांगचूक यांच्या आंदोलनात अडथळा न आणता त्यांची सुटका करणे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणे किंवा त्यांना पदावरून हटवणे आणि NEET परीक्षा प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात उरका बँकांची कामे, पाच दिवसांच्या आठवड्यासाठी बँक कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
  • मनोज जरांगे पाटलांची तपासणी; प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी काय सांगितलं?
  • Trishuli-3 A Hydropower : चिखल, पाणी, 898 लोक फसले, अडकलेल्यांना बाहेर कसं काढलं जातंय? रेस्क्यू ऑपरेशनचा थरार समोर!
  • Video : बिहारी लोकांना शिव्या देण्याआधी….महाराष्ट्रीय लोकांच्या बिहारमधील आदरातिथ्याचा व्हिडीओ पाहाच; पोलीस ऑफिसरला सलाम ठोकाल!
  • IAS दिव्या मित्तल यांचा राजीनामा, भावूक पोस्ट करत म्हणाल्या की, मी मुर्ख होते विचार करायचे की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in