• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘कुठे आहेत तुझे बाबा’ असं डिवचताच मुख्यमंत्री विजय यांना पहिल्यांदाच सणसणीत उत्तर

June 26, 2026 by admin Leave a Comment


तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री विजय यांनी विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर केलेल्या उपरोधिक टीकेमुळे मोठं राजकीय वादळ निर्माण झालं आहे. आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री विजय यांनी उदयनिधी यांना डिवचून विचारलं, “तुमचे वडील कुठे आहेत?” माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. कोलाथूर मतदारसंधात टीव्हीकेकडून त्यांना धक्कादायक पराभव झाला होता. तेव्हापासून ते विधानसभेबाहेर राहिले आहेत. तर त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन हे विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत आहेत. आता स्टॅलिन यांनी विजय यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचसोबत डीएमके नेत्यांनी असेही संकेत दिले आहेत की, पक्षप्रमुख स्टॅलिन राज्यातील आगामी पोटनिवडणुका लढून विधानसभेत परत येऊ शकतात.

एम. के. स्टॅलिन यांचं प्रत्युत्तर

विजय यांच्या उपरोधिक प्रश्नावर प्रतिक्रिया देताना एम. के. स्टॅलिन म्हणाले, “मी लोकांच्या हृदयात आहे. मी विधानसभेत नाही, पण लोक जिथे मला शोधतील तिथे मी आहे.” त्यानंतर एका जाहीर सभेत बोलताना द्रमुकचे ज्येष्ठ नेते आणि आमदार के. एन. नेहरू यांनी स्टॅलिन यांचा विधानसभेत पुनरागमन लवकरच होऊ शकतं, असं सूचक वक्तव्य केलं. “त्यांनी आमच्या नेत्याला विचारलं, तुमचे वडील कुठे आहेत? ते येतील, लवकरच येतील. सध्या आम्ही इतकंच सांगू शकतो. ते पुन्हा येऊन जबाबदारी स्वीकारतील. हे निश्चित आहे. कालपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते शांत होते. पण विजय यांच्या उपरोधिक प्रश्नानंतर संपूर्ण तमिळनाडूतील कार्यकर्त्यांना हेच हवं आहे”, असं नेहरू म्हणाले.

तमिळनाडूतील पोटनिवडणुकांवर लक्ष

नेहरू यांच्या या वक्तव्याचा असा अर्थ लावला जात आहे की, डीएमकेच्या एका गटाला स्टॅलिन यांनी येत्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकांपैकी एक निवडणूक लढवावी असं वाटतंय. सध्या तमिळनाडूमध्ये सहा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणं आवश्यक आहे. विजय हे दोन मतदारसंघांमध्ये जिंकले होते. त्यापैकी त्यांनी पेरांबूरची जागा कायम ठेवत तिरुची पूर्व इथून राजीनामा दिला. त्यानंतर ही जागा रिक्त झाली. तर एआयएडीएमकेच्या पाच आमदारांनी राजीनामा देऊन त्यापैकी चार नंतर टीव्हीकेमध्ये सामील झाले. त्यामुळे या सहा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी मात्र निवडणूक लढवण्याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु त्यांनी मुख्यमंत्री विजय यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री विजय यांच्या “तुमचे वडील कुठे आहेत?” या वक्तव्यावर त्यांच्याच आघाडीतील काही जणांकडून टीका झाली आहे. व्हीसीकेचे प्रमुख थोल थिरुमावलवन म्हणाले, “असं वक्तव्य मुख्यमंत्रीपदाच्या प्रतिष्ठेला शोभणारं नाही. विजय यांनी असा वैयक्तिक उल्लेख टाळायला हवा होता. त्यांनी सभागृहाची शिस्त राखावी.”



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल
  • भीषण अपघाताचा थरार! ट्रक-पिकअपच्या धडकेत ७ जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती नाजूक
  • मोठी बातमी! मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; राज्यातील 2 खासदारांना संधी मिळणार..
  • Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीला आज एक चान्स मिळाला, तर एकाचवेळी सचिनपासून रोहितपर्यंत ब्रेक होऊ शकतात 5 रेकॉर्ड
  • अक्षय-रवीनासोबत जे खऱ्या आयुष्यात घडता घडता राहिलं, ते पडद्यावर पूर्ण होताच टाळ्यांचा कडकडाट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in