• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कान्समधील लूकवरून ऐश्वर्या रायची खिल्ली उडवणाऱ्यांना माधुरी दीक्षितने सुनावलं; म्हणाली ‘कपडे अन् वय..’

June 1, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जोपर्यंत रेड कार्पेटवर येत नाही तोपर्यंत जगप्रसिद्ध ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ परिपूर्ण वाटत नाही असं अनेकदा म्हटलं जातं. यावर्षीही चाहते ऐश्वर्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ऐश्वर्या या अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात पोहोचली. यावेळी तिच्या लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. मात्र काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं. याप्रकरणी आता माधुरी दीक्षितने ट्रोलर्सना सुनावलं आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जोपर्यंत रेड कार्पेटवर येत नाही, तोपर्यंत जगप्रसिद्ध ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ परिपूर्ण वाटत नाही, असं अनेकदा म्हटलं जातं. यावर्षीही चाहते ऐश्वर्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ऐश्वर्या या अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात पोहोचली. यावेळी तिच्या लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. मात्र काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं. याप्रकरणी आता माधुरी दीक्षितने ट्रोलर्सना सुनावलं आहे.

'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी म्हणाली लोकांनी चुका काढायला आज सुरुवात केली असं नाही आधीही ते अशाच प्रकारे ट्रोल करायचे फालतू कमेंट करायचे. फक्त इतकाच फरक आहे की तेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म नव्हता. आज सोशल मीडियाच्या रुपात त्यांना खुला मंच मिळाला आहे.

'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी म्हणाली, “लोकांनी चुका काढायला आज सुरुवात केली असं नाही, आधीही ते अशाच प्रकारे ट्रोल करायचे, फालतू कमेंट करायचे. फक्त इतकाच फरक आहे की तेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म नव्हता. आज सोशल मीडियाच्या रुपात त्यांना खुला मंच मिळाला आहे.”

'देवदास'मधील सहअभिनेत्री ऐश्वर्या रायचा बचाव करताना यावेळी माधुरी पुढे म्हणाली ऐश्वर्या कोणी सर्वसामान्य स्टार नाही तर तिचा एक वेगळा वारसा आहे. गेल्या 20 वर्षांपासून ती या फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाऊन जागतिक मंचावर भारताचं नाव मोठं करतेय. तिने नेहमीच संपूर्ण देशाला अभिमान वाटावं असंच काम केलं आहे. ती एक खरी ग्लोबल स्टार आहे.

'देवदास'मधील सहअभिनेत्री ऐश्वर्या रायचा बचाव करताना यावेळी माधुरी पुढे म्हणाली, “ऐश्वर्या कोणी सर्वसामान्य स्टार नाही, तर तिचा एक वेगळा वारसा आहे. गेल्या 20 वर्षांपासून ती या फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाऊन जागतिक मंचावर भारताचं नाव मोठं करतेय. तिने नेहमीच संपूर्ण देशाला अभिमान वाटावं असंच काम केलं आहे. ती एक खरी ग्लोबल स्टार आहे.”

ऐश्वर्या रायसारख्या व्यक्तिमत्त्वाला कोणत्याही वजनकाट्यात कपड्यांच्या आकाराने किंवा वयाच्या आकड्यांमध्ये मोजता येणार नाही. ती बाहेरून जितकी सुंदर आहे तितकीच ती आतूनही सुंदर आहे. मी तिच्यासोबत काम केलं आहे आणि मला तिचा स्वभाव चांगला माहीत आहे. त्यामुळे लोकांनी सावधगिरीने बोलावं अशा शब्दांत माधुरीने टीकाकारांना सुनावलं.

ऐश्वर्या रायसारख्या व्यक्तिमत्त्वाला कोणत्याही वजनकाट्यात, कपड्यांच्या आकाराने किंवा वयाच्या आकड्यांमध्ये मोजता येणार नाही. ती बाहेरून जितकी सुंदर आहे, तितकीच ती आतूनही सुंदर आहे. मी तिच्यासोबत काम केलं आहे आणि मला तिचा स्वभाव चांगला माहीत आहे. त्यामुळे लोकांनी सावधगिरीने बोलावं”, अशा शब्दांत माधुरीने टीकाकारांना सुनावलं.

ट्रोलर्सवर आपला संताप व्यक्त करत माधुरीने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. तिने विचारलं जेव्हा लोक कोणाच्या दिसण्यावर अशा घाणेरड्या टिप्पण्या करतात तेव्हा ते आजच्या तरुणांना कोणता संदेश देत असतात? आजच्या मुलांनी हे शिकायला हवं का की एखाद्या व्यक्तीची किंमत फक्त त्याच्या दिसण्यावरून ठरते त्याच्या कर्तृत्त्वावरून नाही? यामुळे समाजात खूप चुकीचा संदेश जातो.

ट्रोलर्सवर आपला संताप व्यक्त करत माधुरीने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. तिने विचारलं, “जेव्हा लोक कोणाच्या दिसण्यावर अशा घाणेरड्या टिप्पण्या करतात, तेव्हा ते आजच्या तरुणांना कोणता संदेश देत असतात? आजच्या मुलांनी हे शिकायला हवं का की, एखाद्या व्यक्तीची किंमत फक्त त्याच्या दिसण्यावरून ठरते, त्याच्या कर्तृत्त्वावरून नाही? यामुळे समाजात खूप चुकीचा संदेश जातो.”



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग
  • Drishyam 3: विजय साळगावकरचा शेवटचा डाव, अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’; दोन भागांनी वाढवलेलं गूढ आता संपणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in