• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कांद्यासोबत बिडीही आली ! झोमॅटोवरून पावभाजी मागवणाऱ्या ग्राहकाची पोस्ट व्हायरल

September 5, 2026 by admin Leave a Comment


आपल्यापैकी अनकेजण विविध ॲप्सवरून, ऑनलाइन जेवण मागवत असतील. पण कधी कधी जेवणासोबत अशी एखादी गोष्ट येते, ज्याने माणूस थक्क होतो. असंच काहीस घडलं बंगळुरूत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत . त्या व्यक्तीने झोमॅटोवरून जेवण मागवलं, त्याच्या घरी पावभाजीची डिलीव्हरीही आली. पण जेवायला बसल्यावर तो हैराणच झाला,कारण पावभाजसोबत जो कांदा येतो ना, त्यासोबत एक बिडी आली होती. हो चक्क बिडी.. पावभाजीसोबत कांदा-लिंबू असलं ती स्वाद अजुून वाढतो, पण त्याऐवजी या ऑर्डरमध्ये बिडी आल्याने तो ग्राहक हैराणच झाला. त्याने लागलीच त्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.

नक्की काय घडलं  ?

लिंक्डइन युजर प्रियमने याबद्दल पोस्ट केली आहे. मी जेवणासाठी झोमॅटोवरून पावभाजी मागवली होती पण मला त्यासोबत बिडी मिळाली. त्याने त्या डिशचा आणि बिजीचा फोटोही टाकला होता. पावभाजी सोबत बिडी फ्री फ्री फ्री… पण असं काही होईल याची मला बिलकूल अपेक्षा नव्हती. ती बिडी संपूर्णपणे जळालेली होती आणि कांद्याच्या शेजारीच ठेवलेली दिसत होती, असंही त्याने लिहीलं.

या पोस्टसोबत प्रियमने झोमॅटोलाही टॅग केलं. कंपनीने या प्रकाराची दखल घेतल लगेच प्रतिक्रिया दिला. नेमकं काय घडलं ते डिटेल्स द्या, या संपूर्ण प्रकरणाची आम्ही चौकशी करू, असं आश्वासनही झोमॅटोतर्फे देण्यात आलं. ‘ हॅलो प्रियम, कृपया प्रायव्हेट मेसेजद्वारे आम्हाला तुमचा ऑर्डर आयडी द्या, आम्ही या प्रकरणाची चौकशी करू’ असं त्यांनी लिहीलं. त्यानंतर त्या ग्राहकाल पुढल्या ऑर्डरसाठी झोमॅटोने 100 रुपयांचं कूपनही दिलं, अशी माहिती समोर आली.

अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

रिपोर्टनुसार, पॅकिंगच्या प्रक्रियेदरम्यान बीडी नेमकी कोणत्या टप्प्यावर खाद्यपदार्थांच्या पाकिटात पोहोचली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेची कंपनीकडून चौकशी करण्यात आली आहे की नाही किंवा याप्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली,हेही अजूनतरी समोर आलेलं नाहीये.

मात्र ही घटना सोशल मीडियावर समोर आल्यानंतर युजर्सकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या प्रकाराची खिल्ली उडवत विनोदी कमेंट्स केल्या, तर काहींनी याला ‘अतिरिक्त धुराची चव’ असे म्हटले. एका युजरने तर विनोदी अंदाजात याला ‘सीझनल ऑफर’ असं म्हटलं.

मात्र, अनेक युजर्सनी या घटनेकडे गांभीर्याने पाहत अन्नाची स्वच्छता आणि पॅकेजिंगच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली. बाहेरून अन्न मागवण्यापेक्षा घरचे जेवण अधिक सुरक्षित असतं, असंही एका युजरने यावर कमेंट करताना लिहीलंय.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दुलीप ट्रॉफी अंतिम फेरीत शमीचं ‘शतक’, क्रिकेट अशोसिएशन ऑफ बंगालने केलं सन्मानित
  • Vastu Shastra : तुमच्याही घरात असतील या वस्तू तर घरात कधीच टिकणार नाही पैसा, वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • Gulabrao Patil : ‘हम दो हमारे दो और… इंग्लिश में जाने दो’ भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
  • Chanakya Niti : आयुष्यात या तीन गोष्टी प्रत्येक माणसाकडे हव्याच, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
  • 2252 किमीची राईड, कारगिलमध्ये फडकवला 1000 फुटांचा तिरंगा अन् सांगता डोंबिवलीच्या दहीहंडीत; रोहित आचरेकरांचा अंगावर काटा आणणारा प्रवास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in