
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला जाणार आहे. रविवारी 6 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत मोहम्मद शमी करिअरमधील 100वा फर्स्ट क्लास सामना खेळणार आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)
या सामन्यापूर्वी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने चेन्नईमध्ये मोहम्मद शमीला सन्मानित केलं. सीएबी अध्यक्ष सौरव गांगुलीकडून संघाचे कोषाध्यक्ष संजय दास यांनी अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला सन्मानचिन्ह दिलं. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)
या सन्मान सोहळ्यावेळी मोहम्मद शमीला माजी कर्णधार सौरव गांगुलीची स्वाक्षरी असलेली खास 100 नंबरची जर्सी आणि स्वाक्षरी केलेला क्रिकेट चेंडू प्रदान करण्यात आला. तसेच चांदीचे स्मृतिचिन्हही देण्यात आलं. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)
ईस्ट झोन संघाने स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला टीमकडून स्वाक्षरी केलेली एक जर्सी दिली गेली. यावेळी त्याच्यासोबत कर्णधार इशान किशन आणि उपकर्णधार वैभव सूर्यवंशी दिसले. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)
मोहम्मद शमीचा फर्स्ट क्लास करिअरला सुरुवात 2010 मध्ये झाली होती. त्याने आतापर्यंत 99 फर्स्ट क्लास सामन्यात 382 विकेट घेतल्या. या दरम्यान त्याने 15 वेळी पाच विकेट घेतल्या. तर दोन वेळा 10 विकेट काढल्या आहेत. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)




Leave a Reply