• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : आयुष्यात या तीन गोष्टी प्रत्येक माणसाकडे हव्याच, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

September 5, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य यांचा राजा धनानंदच्या राज्यात अपमान झाला होता, त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी चाणक्य यांनी आपल्या कुटनीतीच्या जोरावर धनानंदची सत्ता उलथून लावली आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केला. चाणक्य म्हणतात माणसाला त्याच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही गुणांची आवश्यकता असते, ते गुण जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होतात. परंतु ते गुण जण तुमच्यामध्ये नसतील तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यासाठी फार वेळ लागत नाही. तसेच पुढे चाणक्य यांनी असं देखील म्हटलं आहे, की प्रत्येक गोष्टीमधून माणसाने शिकलं पाहिजे, जो माणूस शिकतो तो त्याच्या आयुष्यात पुढे जातो. परंतु जो माणूस एखाद्या गोष्टीमधून धडा घेत नाही, तो मात्र आपल्या आयुष्याची लढाई हरतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संयम – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात संयम हा असायलाच हवा, ज्याच्या आयुष्यात संयम असतो, तो या जगातील कोणतीही गोष्ट सहज प्राप्त करू शकतो. त्यामुळे आयुष्यात चढ-उतार येतील, काही दुख:चे क्षणही वाट्याला येतील, परंतु अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमचा संयम ढळू देऊ नका. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात संयम ठेवून काम केलं तर एक दिवस नक्कीच तुमचा विजय होणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणीही पराभूत करू शकत नाही. मात्र तुम्ही जर कठीण परिस्थितीमध्ये तुमचा संयम गमावला तर मात्र तुमच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे संयम ही एक अशी गोष्ट आहे, जिच्या जोरावर तुम्ही जगातील कोणतीही गोष्ट सहज मिळू शकतात.

कष्ट – चाणक्य म्हणतात कष्ट ही अशी गोष्ट आहे, जी आजपर्यंत कोणालाच चुकली नाही. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कष्टायची तयारी ठेवा, कारण तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढं जास्त यश तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळेल. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात कष्टच केले नाहीत तर मग मात्र तुमच्या अडचणी वाढतील, असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे.

कृतज्ञता – चाणक्य म्हणतात माणसाने सदैव नम्र असलं पाहिजे, नम्रता हेच बुद्धिवान व्यक्तीचं लक्षणं आहे, तुम्ही जर नम्र असाल तर यश हे तुम्हाला मिळेलच, परंतु काही लोक हे नम्र नसतात. अशा लोकांचं आयुष्य हे अनेकदा संकटात सापडतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट ही नम्रतेनं स्विकारायला पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
  • देवेंद्र फडवणीस ते आदित्य ठाकरे; मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला
  • Priyanka Barve Photoshoot : श्रीकृष्ण जन्माष्टमीला मराठमोळ्या गायिकेचा मनमोहक अंदाज; लूकमध्ये चाहतेही हरवले, दिली थेट ‘राधे’ची उपमा
  • थर न लावता विहिरीवर उडी मारत दहीहंडी फोडण्याची अनोखी प्रथा पाहिलीय का ?
  • Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in