• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कांदिवलीतील दुकानांमधून ब्रँडेड छत्र्यांची चोरी; सीसीटीव्हीत भामटा कैद

July 21, 2026 by admin Leave a Comment


मुंबईच्या कांदिवलीतील चारकोपमध्ये एक सीरियल छत्री चोर सक्रिय झाला आहे. या चोराचा सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आला आहे. हा आरोपी दुकानातू ब्रँडेड छत्री चोरताना दिसला. त्याचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालं आहे. एक अनोळखी व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून चारकोपमधील दुकानांना लक्ष्य करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्यावेळी दुकानात ग्राहकांची गर्दी असते, तेव्हाच हा चोर बाहेर कार्ट्सवर डिस्प्लेला ठेवलेल्या (ग्राहकांना पाहण्यासाठी) ब्रँडेड छत्र्या चोरून पळून जातो. त्यातही जेव्हा जोरदार पाऊस सुरू होतो, तेव्हाच हा चोर येतो आणि दोन ते तीन छत्र्या उचलून गर्दीत गायब होतो, अशी तक्रार दुकानदारांनी केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत अनेक दुकानदारांनी तक्रारी दिल्या आहेत. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.

ब्रँडेड छत्र्यांची चोरी

पावसाळ्यात अनेक ग्राहक छत्री खरेदी करण्यासाठी दुकानात येतात. त्यांना त्यांच्या पसंतीची छत्री सहजपणे निवडता यावी यासाठी दुकानदार दुकानाबाहेर विविध प्रकारच्या छत्र्या मांडून ठेवतात. मात्र तिथून छत्र्यांची चोरी होऊ शकते, याचा विचारसुद्धा त्यांनी केला नसेल. गेल्या काही दिवसांपासून चारकोप परिसरातील दुकानांमधून या छत्र्या गायब होऊ लागल्या होत्या. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं ठरवलं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीची घटना कैद झाली आहे.

आरोपीचा शोध सुरू

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर एका दुकानाबाहेर ठेवलेल्या छत्र्या चोरताना दिसत आहे. त्यानंतर तो तिथून छत्र्या घेऊन जातो, मात्र तरीही कोणी त्याला अडवताना दिसत नाही. आता दुकानदारांच्या तक्रारीनंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाला असून त्याच्या मदतीने पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर चोरीची घटना करताना दिसून आला होता. दुकानांमधील या छत्र्या ब्रँडेड असल्याने त्यांची किंमतही अधिक आहे. त्यामुळे दुकानदारांचं नुकसान झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग काही दुकांनामध्ये या चोरीच्या घटना घडल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Airtel, Jio की Vi, कोण ठरलं नंबर वन? TRAI चा रिपोर्ट समोर
  • सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच…
  • Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल
  • थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
  • एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in