
कल्याण मुरबाड रोडवरील शहाड उड्डाणपुलाजवळ एक संतापजनक प्रकार घडलाय. ॲम्बुलन्सचा सायरन वाजवून सुद्धा विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकानं आणि कंडक्टरनं मी पॅसेंजर भरतोय, तुला काय करायचं ते कर अशी हुज्जत घालत बस रस्त्यातच उभी ठेवली. त्यामुळे तब्बल 15 मिनिटं ॲम्बुलन्स अडकून पडली. या प्रकाराचा व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांशी आणि पत्रकारांशी चालक कंडक्टरनं वाद घातला. अखेर नागरिकांचा रोष वाढताच त्यांनी बस तिथून काढली. या बेजबाबदार चालक आणि कंडक्टरवरती कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करतायत. तुमच्यामुळेच अटकली आहे काय प्रवासी… माझ्या साईडला गाडी घेतलेली आहे. पाठी ॲम्बुलन्स अटकली थोडी बाजू… चढवण्यासाठी गाडी गाडी थांबवली आहे. हा मग ॲम्बुलन्स अटकली तर… इथे बस स्टॉप आहे. बस स्टॉप प्रवासी चढवण्यासाठी गाडी बाजूला घेतलेली आहे. ॲम्बुलन्स पाठी हॉर्न वाजवते. त्या बाजूला रस्ता मोकळा आहे. त्या बाजूला रस्ता आहे… रस्त्यामध्ये माझी गाडी नाही. ह्या बाजूला कुठे रस्ता आहे? ह्या बाजूला रस्ता आहे. काय तुला काय करायचं ते कर. ह्या बाजूला रस्ता मोकळा आहे. मी माझ्या स्टॉपला गाडी लेफ्ट साईडला थांबवली आहे.
Leave a Reply