• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कपूर घराण्यातील लेकीचं 45 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण; नवऱ्याकडे कोट्यवधींची संपत्ती

April 27, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री नीतू कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘दादी की शादी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्यांच्यासोबत कॉमेडियन कपिल शर्मा आणि सादिया खातीब यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये कपूर घराण्याची एक लेकसुद्धा झळकली आहे. वयाच्या 45 व्या वर्षी तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटात नीतू कपूर यांनी ‘दादी’ची भूमिका साकारली असून त्यांना लग्न करायची इच्छा आहे. परंतु त्यांचं लग्न लावण्याच्या नादात कपिल शर्मा आणि सादिया अडचणीत अडकतात. हा चित्रपट नीतू कपूर यांच्यासाठी खूप खास आहे, कारण याच चित्रपटातून त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे चित्रपटातही दोघांनी मायलेकीचीच भूमिका साकारली आहे.

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी, तर रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी ही गेल्या अनेक वर्षांपासून फॅशन डिझायनिंग क्षेत्रात सक्रिय आहे. तिचा पती भरत साहनी हा दिल्लीतील सर्वांत मोठा बिझनेसमन आहे. त्याचं गार्मेंट एक्स्पोर्टचं काम असून, त्याचं मूल्य जवळपास 250 कोटींच्या घरात आहे. भरत साहनी गेल्या दोन दशकांपासून या बिझनेसमध्ये सक्रिय असून त्याची कंपनी परदेशातील अनेक मोठ्या रिटेल ब्रँड्सना कपड्यांचा पुरवठा करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by RTake Studios (@rtakestudios)

रिद्धिमा कपूरशी लग्न केल्यानंतरही भरत लाइमलाइटपासून दूरच राहणं पसंत करतो. तो फार क्वचित बॉलिवूड पार्ट्यांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये दिसून येतो. नेटफ्लिक्सच्या ‘फॅब्युलस लाइव्स व्हर्सेस बॉलिवूड वाइव्ज’ या शोच्या तिसऱ्या सिझनमध्ये त्याने हजेरी लावली होती. यामध्ये तो सासू नीतू कपूर, पत्नी रिद्धिमा आणि मुलगी समायरासोबत उपस्थित होता. कपूर कुटुंबीयांच्या दिवाळी आणि न्यू-इअर पार्ट्यांमध्येही भरतला पाहिलं गेलंय. भरतची वैयक्तिक संपत्ती जवळपास 100 कोटींच्या घरात आहे. पत्नी रिद्धिमा आणि संपूर्ण कुटुंबीयांसोबत तो दिल्लीतील एका पॉश परिसरात राहतो.

रणबीर कपूरने जरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं असलं तरी रिद्धिमाने कधीच ग्लॅमर विश्वात पाऊल ठेवण्याचा विचार केला नव्हता. आता वयाच्या 45 व्या वर्षी तिला ‘दादी की शादी’ या चित्रपटाची ऑफर मिळाली. हा चित्रपट येत्या 8 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कपिल शर्मानेच या चित्रपटाची निर्मिती केली असून आशिष आर. मोहनने त्याचं दिग्दर्शन केलं आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विजय माल्यामुळे दीपिका – कतरिना एका रात्रीत बनल्या स्टार, कॅलेंडरसाठी बिकिनी फोटोशूट आणि… ‘बिग बॉस’फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा
  • Sanjay Nirupam Full Press | मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची सरकारकडे पत्राद्वारे मागणी
  • LSG vs KKR : प्रेम, दु:ख, अभिमान, भावनांचा संगम, केकेआरच्या विजयापेक्षा रिंकू सिंहच्या भावी पत्नीच्या इमोशन्सची जास्त चर्चा VIDEO
  • आधी मराठी माणसाला सक्ती करा..; रिक्षाचालकांना भाषा सक्तीवरून मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत
  • तुरुंगात लिहिली गेली 33 वर्षे जुन्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सीक्वलची कथा, 4000 कैद्यांनी दिली आयडिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in