• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विजय माल्यामुळे दीपिका – कतरिना एका रात्रीत बनल्या स्टार, कॅलेंडरसाठी बिकिनी फोटोशूट आणि… ‘बिग बॉस’फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा

April 27, 2026 by admin Leave a Comment


भारतीय उद्योजक विजय माल्या हजारो कोटींचा घोटाळा करून लंडन येथे पळून गेला… गेल्या अनेक वर्षांपासून भारतातून पळ काढलेली माल्या लंडन येथे राहत आहे… आज माल्या भारतात नाही. पण तरी देखील कोणत्या न कोणच्या कारणामुळे चर्चेत असतो. अशात ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सोनाली राऊत हिने विजय माल्या याच्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. सोनाली हिच्या म्हणण्यानुसार, अनेक बॉलिवूड अभिनेत्री विजय माल्या याच्यामुळे प्रसिद्धीझोतात आल्या… असा दावा सोनाली हिने केला.

सोनाली ‘बिग बॉस मराठी 6’ मध्ये दिसली होता… शोमधून बाहेर आल्यानंतर तिने घरातील साफ – सफाईवरून निर्मात्यांची पोलखोल केली. सोनाली म्हणालेली, ‘बिग बॉसच्या’ घरातील अस्वच्छतेमुळे मला स्किन एलर्जी झाली. अशात लहानपणापासूनच स्वच्छतेबद्दल असा दृष्टिकोन आहे का, असं विचारले असता सोनालीने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “नाही. मी हे सगळं विजय मल्याकडून शिकले.”

सोनाली म्हणते, ‘मी किंगफिशर कँलेंडर केलं, तेव्हा माझी भेट विजय माल्यासोबत झाली. तो एक क्लासी व्यक्ती आहे… माल्याला पार्टी करायलाा प्रचंड आवडतं…. किंगफिशर कँलेंडरच्या शूट दरम्यान, मी अनेक मोठ्या लोकांना भेटली आहे… मी विजय मल्ल्या यांच्यामुळे खूप प्रभावित झाले. कारण तो क्लासी आणि दयाळू माणूस आहे… त्याला द्यायचं माहिती आहे… लोक काय विचार करतील याचा विचार तो कधीच करत नाही. तो कायम विचारायचा तुला काय करायचं आहे… किंगफिशरमुळे आमच्या करियरला एक चांगली दिशा मिळाली… यामुळेच दीपिका – कतरिना यांसारख्या अनेक अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आल्या…

सोनाली पुढे म्हणते, बिकीना कॅलेंडर शूट होतं… या शूट दरम्यान अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मी देखील किंगफिशर कॅलेंडरचा एक भाग होते… पहिले तीन महिने तर फिटनेस, स्किन केअर आणि सर्व गोष्टींची ट्रेनिंग दिली जाते. केसांची काळजी कशी घ्यायची, काय खायचं… कसं राहायचं, काय बोलायचं… सर्व काही विजय माल्याने मला शिकवलं होतं.

अभिनेत्री पुढे म्हणजे, जेव्हा किंगफिशर कॅलेंडरसाठी मला विचारण्यात आलं तेव्हा मी थोडी जाड होते… पण तीन महिन्यात माझं वजन कमी झालं.. मी बेस्ट ट्रेनरकडे गेली होती… हे सर्वकाही फक्त विजय माल्यामुळे शक्य झालं आहे… तो सर्व गोष्टींची काळजी घ्यायचा… स्वतःला महत्त्व कसं द्यायचे हे त्यानेच मला शिकवलं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रेमाचं जाळं, लग्नाचा फास, बिग बॉस फेम हिरोईनचा हादरवणारा कांड; त्या तरण्या पोरासोबत घडलं असं की वाचून हादरवून जाल!
  • राघव चड्ढांचा ‘आप’ला दे धक्का, पण नेमके कारण काय? भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला? खळबळजनक माहिती पहिल्यांदाच समोर!
  • महाराष्ट्रातल्या दुर्गम गावातली कथा, प्रत्येक प्रसंगात दडलेलं गूढ, थरार.. दुसऱ्या आठवड्यातही दमदार प्रतिसाद
  • घर खरेदीसाठी पैशांची चिंता सोडा! सर्वात कमी व्याजदर असलेल्या कंपन्यांची नावं आली समोर, तपासा डिटेल्स
  • Raj Thackeray | मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार, आदेश देत म्हणाले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in