• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कंडोम तयार करणाऱ्या कंपनीची कमाल, एका वर्षात १ लाखाचे झाले ९ लाख रुपये, गुंतवूकदार मालामाल

July 11, 2026 by admin Leave a Comment


आपण चर्चा करत आहोत मेल आणि फिमेल कंडोम, ल्यूब्रिकेंट्स आणि डायग्नोस्टीक उत्पादने तयार करणारी स्मॉलकॅप कंपनी क्यूपिड लिमिटेड (Cupid Ltd)च्या शेअर्सची.गेल्या एक वर्षातच या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 866% हून जास्त रिटर्न दिला आहे. हे शेअर इतके तेजीत का ?

Cupid Ltd कंपनीच्या शेअर्सनी गेल्या एक वर्षात शानदार कामगिरी केली आहे. या शेअर्समध्ये कोणी एक वर्षांपूर्वी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्या एक लाखाचे आज ९.७ लाख रुपये झाले आहेत. गेल्या सहा महिन्यात या शेअरने १४५ टक्के, गेल्या तीन महिन्यात १२८ टक्के आणि गेल्या एक वर्षात या शेअर्सने ४० टक्क्यांचा परतावा दिला आहे.

शुक्रवारी क्युपिडच्या शेअर्समध्ये १.४१ टक्के उसळी आली होती.हा शेअर २१२.९८ रुपयांवर बंद झाला. कंपनीचे बाजारातील मूल्य सुमारे २८,५०० कोटी रुपयांचे आहे.

Cupid च्या शेअर्समध्ये तेजी येण्यास कंपनीचे तिमाहीचे मजबूत निकाल म्हटले जात आहेत. आर्थिक वर्षे २०२५-२६ मध्ये कंपनीचा महसूल दुपटीने वाढून ३९१ कोटी रुपये झाला आहे. गेल्यावर्षी तो १८३ कोटी रुपये होता. कंपनीचे नेट प्रॉफीट वाढून १०८ कोटी रुपये झाले आहे, जे आधी ४१ कोटी रुपये होते. याशिवाय ऑपरेटिंग मार्जिन देखील सुधारुन ३८ टक्के झाले आहे.

कंडोम व्यतिरिक्त, कंपनीच्या डायग्नोस्टिक्स क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. ही कंपनी वॉटर-बेस्ड ल्युब्रिकंट्स, पर्सनल केअर उत्पादने आणि इन विट्रो डायग्नोस्टिक (IVD) किट्सचे उत्पादन करते.( डिस्क्लेमर – कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत अवश्य घ्या.)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेच नंबर 1, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मागं टाकलं, काय घडलं?
  • सिया गोयलचा तुरुंगात जलवा! मिळतेय VIP ट्रीटमेंट? लोहगड प्रकरणात मोठी अपडेट समोर
  • MPSC Paper Leak: वा रे गुरुजी, एमपीएससी पेपरफुटीचा आरोपी तर ‘आदर्श’ शिक्षक! हेट स्टोरीतून असा उघड झाला मामला
  • Nepal Flood: भूकंप, पाऊस की हिमस्खलन.. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराचं खरं कारण समोर
  • Rule Change : LPG ते विमानतळापर्यंत…! 1 सप्टेंबरपासून देशात होणार 5 मोठे बदल, काय काय महागणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in