• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कंगना रणौत केंद्रीय शिक्षण मंत्री होणार? पोस्ट व्हायरल; Fact Check काय?

July 27, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये CJP ने मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. अशातच आता सोशल मीडियावर कंगना रणौत शिक्षणमंत्री होणार? अशा बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर देखील सतत अनेक दावे करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत असतात. ज्यामध्ये अनेक पोस्ट दिशाभूल करणाऱ्या किंवा पूर्णपणे बनावट असतात.

सध्या अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतबाबत अशीच एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाच्या पुढील शिक्षणमंत्रीपदाची मागणी केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्यात कोणतेही तथ्य नसून ही पोस्ट पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले आहे.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये कंगना रणौत यांचे अधिकृत वक्तव्य असल्याचा भास होतो आहे. या पोस्टमध्ये कंगना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला शिक्षणमंत्री बनविण्याची विनंती केल्याचे दाखवण्यात आले आहे.

याशिवाय, पोस्टमध्ये उपरोधिक टिप्पणी करत कंगना यांना शिक्षणाचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजते, कारण भारताला ‘खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’ असे विधान त्यांनी पूर्वी केले होते असा उल्लेखही करण्यात आला आहे.

NEET परीक्षेबाबतही खोटा दावा

या बनावट पोस्टमध्ये NEET परीक्षेबाबतही विचित्र दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, कंगना या शिक्षणमंत्री झाल्यास त्यांचे चित्रपट थिएटरमध्ये पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत अतिरिक्त गुण दिले जातील असे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या दाव्यांमुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

❗ This is FAKE ❗
Kangana Ranaut never posted any such story. This appears to be a deliberate misinformation campaign, likely by Alia Bhatt’s PR team, aimed at dragging Kangana into unnecessary controversy.@KanganaTeam please take note and consider action against the accounts! https://t.co/CF0SgcBeBh

— Revolver Rani 🥀 🖤 (@RevolverRaniEra) July 15, 2026

व्हायरल पोस्टची पडताळणी केल्यानंतर हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले. कंगना रणौत यांनी कोणत्याही अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर किंवा इन्स्टाग्राम स्टोरीवर अशा प्रकारची कोणतीही पोस्ट केलेली नाही.

तज्ज्ञांच्या मते, ही प्रतिमा एआय (AI) किंवा फोटो एडिटिंग साधनांच्या मदतीने तयार करण्यात आलेली बनावट पोस्ट असण्याची शक्यता आहे. या पोस्टबाबत कंगना रणौत यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in