• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

औषध निरीक्षक भरती कथित पेपरफुटी प्रकरण, रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट, मोठी अपडेट

July 27, 2026 by admin Leave a Comment


MPSC च्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पेपरफुटीची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच ती तक्रार बनावट असल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली असून, या कथित यू-टर्नमुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. परंतु तक्रारदारावर दबाव आणला गेला असावा असा संशय या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे, या प्रकरणात त्यांनी आज तुकाराम मुंढे यांची भेट घेतली आहे. हे भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

आम्ही तुकाराम मुंढे यांना एक कंपलेंट पत्र दिलं आहे. आम्ही समजू शकतो, एमपीएससी ही एक स्वायत्त संस्था आहे. तुम्ही तिथे काही बोलू शकणार नाही, पण आम्ही दिलेलं पत्र ते नक्की तपासू शकता. तुम्ही जर बघितलं असेल याच्या आधी सुद्धा, हा जो काही लोकेश पाटील आहे उर्फ गैरव पाटील आणि ऋषिकेश गांगर्डे हे जे दोन तरुण आहेत, त्यांनी ते पत्र तुकाराम मुंडे यांच्या ऑफिसला दिलं होतं. 21 जुलै रोजी, आणि त्याच रात्री तुकाराम मुंढे यांच्या ऑफिसने ते पत्र आणि ते सर्व पुरावे एमपीएसीच्या कार्यालयात पाठवले होते, आणि तुम्ही तुमच्या लेव्हलवर योग्य पद्धतीचा निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती.

आज देखील आम्ही त्यासंदर्भात चर्चा केली, तुकाराम मुंढेंचं मत आहे. परीक्षा देऊन जे अधिकारी सरकारमध्ये येतात, ते पारदर्शकपणे परीक्षा देऊन येणं फार महत्त्वाचं आहे. जर पैसे देऊन किंवा एखाद्याच्या ओळखीतून एखादा अधिकारी होत असेल तर असा अधिकारी लोकांना न्याय देऊ शकत नाही. मुंढेंची देखील हीच भूमिका आहे, आणि आमची देखील तीच भूमिका आहे. आता आमचं हे पत्र ते आयोगाकडे पाठवतील अशी आशा आम्ही करत आहोत. विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली.

लोकेश पाटील उर्फ गौरव पाटील हा एकच व्यक्ती आहे. त्याने आयोगाला जे पत्र पाठवलं आहे, त्याची कॉपी आमच्याकडे आहे. ऋषीकेश गांगर्डे नावाची जी व्यक्ती आहे, हा तरुण देखील जेव्हा गौरव पाटील यांनी तक्रार केली होती, तेव्हा तुमकाराम मुंडेंच्या ऑफिसला आला होता. त्याचबरोबर तो एमपीएससी आयोगाकडे देखील गेला होता. काही वेळापूर्वी ऋषीकेश गांगर्डे याने एक व्हिडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, गौरव पाटील माझा मित्र आहे, त्याला धमकावण्यात आल्यामुळे त्याने यातून माघार घेतली परंतु मी अजूनही ठाम आहे, असं या प्रकरणात रोहित पवार यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in