• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओमराजे निंबाळकर यांना मोठा दणका! उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यापूर्वीच पहिला धक्का, थेट 6 हजार..

June 18, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या 6 खासदारांनी वेगळा गट निर्माण करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिले. यात राज्यातील वेगवेगळ्या भागातील खासदार आहेत. पक्षाचा मिळत नसलेला पाठिंबा आणि मतदार संघाला न मिळणाऱ्या निधीच्या पार्श्वभूमीवर हे खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगण्यात आले. काल दिवसभर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. शिवसेना ठाकरे गटाकडून तात्काळ पक्षातील सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आले. आज बैठक दिल्लीत होत आहे. या बैठकीला सर्व खासदारांना उपस्थित राहवे लागणार आहे, तसे आवाहन पक्षाकडून करण्यात आले. आता हे 6 खासदार बैठकीला उपस्थित राहणार का? यावर काही वेळातच उत्तर मिळेल. बंडखोरी करणाऱ्या या 6 खासदारांच्या यादीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश आहे.

ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा कालपासून रंगताना दिसली. यादरम्यानच ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, मी दिल्लीत नाही तर पुण्यात आहे. मात्र, यावेळी ठाकरे यांच्यासोबतच राहणार का? यावर बोलणे ओमराजे निंबाळकर यांनी टाळले. ज्यामुळे आता ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यादरम्यानच धाराशिवकर या निर्णयानंतर ओमराजे निंबाळकर यांना नाकारताना दिसत आहेत. रील स्टार ओमराजेंना नेटकऱ्यांनी नाकारल्याचे दिसतंय. एका दिवसात ओमराजेंना सोशल मीडियावर 6 हजार फॉलोअर्सने अनफॉलो केले. हा ओमराजेंना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वीच ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे.

ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर ओमराजेंना नेटकऱ्यांकडून संतापजनक कमेंट केल्या जात आहेत. पक्षांतराच्या चर्चेनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांना संतापजनक कमेंटला सामोरे जावे लागत आहे. एका दिवसात जवळपास 6 हजार फॉलोअर्सने केले त्यांना अनफॉलो केले. ओमराजे निंबाळकर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने व्हिप जारी केल्यानंतर आज ओमराजे निंबाळकर दिल्ली येथे बैठकीला उपस्थित राहणार का ? याकडे सर्वांच्या नजरा आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in