• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओमराजे निंबाळकर यांच्याकडून नरेंद्र मोदी यांनी घेतली मोठी माहिती, शिंदेंच्या खासदारांसोबत स्वतंत्र चर्चा, थेट..

August 7, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनानिमित्ताने सर्व खासदार दिल्लीत आहेत. यादरम्यानच फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. यादरम्यान ब्रेकफास्टही त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत केला. शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेले 6 खासदारही नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या खासदारांनी ठाकरे गट सोडल्यानंतर विविध कारणे सांगितले. मतदार संघातील विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे प्रमुख कारण होते. यासोबतच पक्षाकडून पाठबळ मिळत नसल्याचाही आरोप होता. यादरम्यान खासदारांसोबतच 43 जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. यात रामदार आठवले, विनोद तावडे यासारख्या नेत्यांचाही समावेश होता.

आता नुकताच या भेटीबद्दल मोठी बातमी पुढे येतंय. इनसाईट बातमी tv9 मराठीच्या हाती लागलीये. शिवसेनेच्या सात खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र संवाद साधला. मतदारसंघातील काम मार्गी लावण्यासाठी सत्तेचा उपयोग करा, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे शिंदेंच्या खासदारांना म्हटले. कुठलीही विकासकामे असतील तरी थेट पंतप्रधान कार्यालयाशी संवाद साधा, असेही त्यांना स्पष्ट सांगण्यात आले.

विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येक खासदाराची स्वतंत्र विचारपूसही केली.  धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या योगाभ्यासाबद्दल मोदींनी माहिती जाणून घेतली, असल्याची माहिती सूत्रांनी दिली. थेट मोठे पाठबळ नरेंद्र मोदी यांनी फुटीर खासदारांना दिले. सत्तेचा वापर कामे करण्यासाठी करा, असेही त्यांनी म्हटले. 6 फुटीर खासदारांसोबत खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.

लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंच्या शिवसेनेला काही मंत्रिपदे मिळणार असल्याचे सांगितले जाते. संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचाैरे या खासदारांनी ठाकरे गटातून बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता
  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम
  • Housewife ITR Rules: गृहिणींनाही भरावा लागणार कर? जाणून घ्या ते नियम जे 99% लोकांना माहीत नाहीत
  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in